महाराष्ट्र

आता मैदान सोडायचे नाही

मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

बीड :
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दि. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांची काल रविवारी (दि. 24) निर्णायक इशारा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतून भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला. ही शेवटची फाइट आहे. विजयाचा गुलाल लावायचा आहे. मुंबईत एकदा गेलोच तर नक्की आरक्षण मिळणार, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनोज जरांगे म्हणाले की, बीडचे मराठे एकत्र येत आहेत. आता पुढचा काळ लढायचा आहे. समाजाला आवाहन आहे की, आपली ताकद मोठी आहे. आता विचार करून पुढे लढायचे आहे. बीडचे रूप पाहून सरकार बेजार होईल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केला.
आम्ही शांततेत आरक्षण मागत आहोत. बीडमध्ये तुम्हाला दंगल घडवायची होती का? सत्ता बदलणार आहे. त्यावेळी आम्ही नक्की लक्षात ठेवू, असा इशारा त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आमचा प्रश्न मार्गी लावा. आम्ही मुंबईला येणार नाही. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. महादेव मुंडे यांच्या हत्येचे मारेकरी पकडून दाखवा, असे आव्हान त्यांनी यावेळी सरकारला दिले.
27 तारखेला अंतरवाली सराटीवरून निघून 29 ऑगस्ट मुंबईला जायचे आहे. यावेळी मान खाली जाईल, असे काहीही करू नका. आपल्याला दगडफेक, जाळपोळ करायची नाही. मुंबईला शांततेत जायचं आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी मराठा समाजाला केले. मुंबई ही न्यायाची भूमी आहे. मुंबईकरांनो, आम्ही चार महिन्यांपासून सांगतोय, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा. आम्ही तुमची लेकरं आहोत. आम्ही तिकडे न्यायासाठी येतोय, कोणाला त्रास द्यायला येत नाही. आम्ही गणेशोत्सवात तुम्हाला एक लाख स्वयंसेवक देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

आरक्षण दिल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही
सत्ताधार्‍यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचे नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात आहे, पण यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले. आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

7 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

7 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

7 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

7 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago