मतचोरीचे पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला द्यावेत

राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांचे प्रत्युत्तर

नाशिक : प्रतिनिधी
आगामी काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, उद्याचा पराभव दिसत असल्याने विरोधक मतचोरीचे आरोप करत आहेत. राज ठाकरेंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला द्यावेत, त्यांनी केलेले आरोप तोंडी चालत नसतात, असे वक्तव्य विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे केले.

काल (रविवारी) सहकारी पतसंस्थांच्या कार्यशाळेसाठी नाशिकला आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काही प्रश्न मुद्दाम पुढे आणले जात आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांना मते मिळतात, मात्र ती मते लाटली जातात. मतचोरी झालेली आहे, असा आरोप केला होता. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, आरोप असे तोंडी चालत नसतात. निवडणूक हरल्यानंतर अशी कारणे ते देत आहेत. येत्या काही महिन्यांत राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात खरी ताकद त्यांना कळेल. केंद्र आणि राज्य सरकार विकासावर काम करत आहे. त्यांना पराभव दिसत आहे म्हणून असे काही प्रश्न पुढे आणत आहेत, असे दरेकर यावेळी म्हणाले.

खा. सुळेंवरही टीका
खासदार सुप्रिया सुळे यांनी खेडगाव (ता. दिंडोरी) येथे मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे? या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, त्यांना हे शोभत नाही. कोणी काय खायचे ते खा, बंदी नाही. मात्र, आपला महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाचा आहे, एवढे लक्षात असू द्यावे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago