राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली :
डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी यशस्वी चाचण्या घेतल्या.
ओडिशाच्या किनार्‍यावर या चाचण्या घेण्यात आल्या. स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचण्यासाठी डीआरडीओच्या संपूर्ण टीमचे तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्व खासगी आस्थापनांचे
अभिनंदन केले.
स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेच्या यशस्वी चाचणीमुळे देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सक्षम होण्यास आणखी मदत होणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. देशाच्या स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेत स्वदेशी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र, प्रगत अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आणि उच्च-शक्तीचे लेसर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र आहेत. या यंत्रणेच्या मदतीने शत्रूचे विमान, रॉकेट, क्षेपणास्त्र, ड्रोन आदी स्वरूपाचे हवाई हल्ले आकाशातच नष्ट करणे तसेच शत्रूवर आकाशातून प्रतिहल्ला करणे शक्य
होणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

7 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago