आस्वाद

आय प्रॉमिस यू..

आय प्रॉमिस यू…
राखी खटोड
कालच तरुणाईने प्रॉमिस डे साजरा केला. ‘आय प्रॉमिस यू’ असे म्हणत एकमेकांना कितीतरी वचने दिली. सुंदर भविष्याची, एकमेकांना साथ देण्याची, एकमेकांबरोबर सदैव असण्याची… अशी बरीच वचने दिली आणि घेतली. या वचनांचा महत्त्व फक्त प्रॉमिस डेपुरतच मर्यादित राहतं, जर ते फक्त ‘डे’ म्हणून दिली जात असतील तर!
खरंच का वचने फक्त एका दिवसापूरतीच बांधील आहेत?  फक्त या दिवशी दिलेल्याच वचनांना महत्त्व आहे?
नक्कीच नाही; वचने कधीही एका दिवसापूर्वी मर्यादित नसतात आणि वचनं फक्त प्रेमीने प्रेमिकेला किंवा प्रेमिकेने प्रेमीला द्यावी असं मुळीच नाही.
वचने द्यावी आणि ती पाळावी असं प्रत्येक नात्यांमध्ये असतं, मग ते नातं कोणतेही असो.
प्रेमीयुगुल सहजच एकमेकांशी वचनबद्ध होतात पण खरंतर वचनबद्ध होण्याची आवश्यकता आज बाकीच्या नात्यांमध्ये जास्त आहे. बाळाचा जन्म झाल्यापासून आई-वडील अगदी प्रेमाने त्याचा संभाळ करतात आणि कितीतरी वेळा त्याच आई-वडिलांना एकाकी जीवन जगावे लागते. कित्येक जण वृद्धाश्रमात आपली मुले भेटायला येतील, अशी वाट पाहून  थकून जातात. लहानपणी आई -आई असं म्हणून मागे पुढे फिरणार, मी मोठा झाल्यावर तुझ्यासाठी हे करेन- ते करेन असं म्हणणारे मुलं त्यांची लहानपणची वचनं विसरून जातात.

परवाचाच अनुभव… परवा मी  एका मावशींना भेटले. लहानपणापासून मी त्यांना बघायचे . त्या खूप  कष्ट करायच्या, सात-आठ घरची धुणी भांडी करायच्या. त्यांच्या अंगावर कधी नवीन साडी बघितली नाही. त्यांची दिवाळी असो का दसरा, आहे त्या कपड्यावर साजरी व्हायची. पण आपल्या मुलाला  मात्र काही कमी पडू द्यायच्या नाही. त्याला खूप खूप शिकवायचं असं त्यांचे स्वप्न!शाळेत असताना इतर मुलाप्रमाणे जे पाहिजे ते पुरवायच्या. त्याला आवर्जून दसरा -दिवाळीत नवीन कपडे घ्यायच्या. त्याला जे खावसं वाटतं, ते घेऊन द्यायच्या पण स्वतःच्या पोटाला चिमटा काढायच्या. मुलगा शिकून मोठा होईल ,कोणी अधिकारी बनेल तर आपल्या कष्टाचं चीज होईल अशी त्यांची इच्छा. आई मी मोठा होईल – छानशी नोकरी करेल, मग तुला हे काम करायची बिलकुल ही गरज लागणार नाही. तेव्हा तू फक्त आराम करायचा-हे त्यांच्या मुलाचे शब्द!  त्या मावशी पण अगदी गर्वाने सर्वांना सांगायच्या ,माझा मुलगा हुशार आहे हो… तो एकदा मोठा झाला , नोकरीला लागला की मला काही करू देणार नाही. छोटसं स्वप्न होतं त्या मावशींचं आणि खूप परिश्रम घेतले त्यांनी आपल्या स्वप्नांसाठी… पण जेव्हा परवा मी त्यांना भेटले, त्यांची अवस्था पाहिली …खूप वाईट वाटलं !
त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे त्यांचा मुलगा मोठा तर बनला होता, पण आईचे परिश्रम विसरला होता. चांगल्या नोकरीला लागला होता पण आईची चाकरी काय सोडवू शकला नव्हता. त्याने पण आपल्या आईला वचन दिले होते ,तुझ्या कष्टाचे मी नक्कीच चीज करून दाखवेल , म्हातारपण  सुखात जाईल याची काळजी घेइल. आपल्या आईला दिलेली वचनं तो विसरून गेला . त्या माऊलीच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाला अजूनही विराम लागला नव्हता. मुलगा असून ती माऊली एकाकी जीवन जगते आहे हे बघून खूप -खूप वाईट वाटलं. काय झालं त्या वचनाचं जे त्या मुलांनी आपल्या आईला दिलं होतं? मुलं मोठी झाल्यावर लहानपणाचे दिवस ,तेव्हा दिलेली वचन क्या सहजपणे विसरून जातात का?
वचन हा फक्त तीन अक्षरी शब्द , पण वचन देणार्‍याला आणि घेणार्‍याला एक वेगळ्याच बंधनाने जोडतो. कोणत्याही वचनाची विश्वास ही पहिली पायरी! वचन घेणार्‍याचा, वचन देणार्‍या वर विश्वास असायला हवा आणि त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून  वचन देणार्‍याने सर्वतोपरी काळजी घ्यावी. फक्त ’आय प्रॉमिस यु’ म्हणून काहीच होत नाही, ते प्रॉमिस मनापासून असायला हवं. भाऊ आपल्या बहिणीला तिच्या सुरक्षिततेच वचन देतो, मित्र किंवा मैत्रीण मैत्री निभवण्याचा वचन देतात, पती-पत्नी एकमेकांना साथ देण्याचा ,एकमेकांचा मान ठेवण्याचा वचन देतात.. अशी भरपूर वचनं प्रत्येक नात्यांमध्ये दडलेली आहेत. आणि त्या वचनांनी  ती नाती एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. नाती जर आयुष्यभराची असतील तर वचने सुद्धा आयुष्यभराची असावी. त्याला एका विशेष दिवसामध्ये नक्कीच अटकवायला नको.
वचनं सुखी संसाराची
वचनं आयुष्यभराच्या साथीची
वचनं निस्सीम प्रेमाची
वचनं आपल्या जबाबदारीची
वचनं आपुलकीची
वचनं घट्ट मैत्रीची
वचनं स्वप्नपूर्तीची
वचनं काळजी घेण्याची
वचनं साथ देण्याची…
वचने म्हणजे नात्यातील दुवा
वचने म्हटली तर विश्वास हवा…
एक वचन मात्र स्वतःशीच
आपण दिलेली वचने पाळण्याचं!

Ashvini Pande

Recent Posts

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

2 hours ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

2 hours ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

3 hours ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

18 hours ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

2 days ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

3 days ago