सटाणा पोलीस स्टेशन हद्दीत उदंड जाहले अवैध धंदे

सटाणा पोलीस स्टेशन हद्दीत उदंड जाहले अवैध धंदे

एफडीए च्या छाप्यांनी केली पोल खोल…

सटाणा (विशेष प्रतिनिधी) बहुचर्चित सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना राजकीय वरद हस्त असल्याच्या चर्चा सर्वश्रुत आहेत .अवैध धंदे आणि गुन्हेगारी फोफावल्याचे झणझणीत अंजन सटाणा पोलिसांना घातले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी घातलेल्या धाडीनं मध्ये हे चित्र उघडकीस आले असून सटाणा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सटाणा पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या काही दिवसांपासून खुलेआम अवैध धंदे वाढीस लागल्याच्या तक्रारी सर्वसामान्य जनतेने थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यात काही सुधारणा होईल अशी आम जनतेची अपेक्षा होती. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनाच सटाणा पोलीस निरीक्षकांनी हातावर तुरी दिली असून अवैध धंदे मोकाट सुरू ठेवले असल्याचे दिसून येत आहे . पोलीस अधीक्षकांच्या क्राईम मीटिंगमध्ये छान छान उत्तर देणाऱ्या सटाणा पोलीस निरीक्षकांचे पितळ यामुळे उघडे पडल्याची चर्चा आहे.

“सिंघम ” पोलीस अधीक्षक
करणार फेरबदल?

सटाणा पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या तक्रारींवर अनेकदा अल्टिमेटम देऊनही सुधारणा होत नसल्याने खांदेपालट करून अवैध धंदे तसेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याबाबत निर्णय होईल का ? अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.

राजकीय वरद हस्ताने अनेक गुन्हे प्रभावित झाल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळेल का अशी माफक अपेक्षा बागलाण वासिय विचारीत आहेत.

एफडीएची दमदार कामगिरी ..

सटाणा पोलीस कुठलीच कामगिरी करत नाही अशा तक्रारी झाल्याने अखेर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाडस दाखवत मोठमोठे व्हाईट कॉलर गुन्हेगार आणि अवैध धंदे चालक यांना गजाआड केल्याच्या चर्चेने नागरिक सुखावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *