नाशिक

भोंदू अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : प्रतिनिधी
राज्यभर चर्चेत असलेल्या अशोक खरात यांच्याविरोधातील आर्थिक फसवणूक प्रकरणात विशेष तपास पथकाने आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 16 मे 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल दुसर्‍या गुन्ह्यातही पुढील तपास सुरू आहे. शिर्डी आणि नाशिक परिसरात आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष तपास पथकाने गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल दुसर्‍या गुन्ह्यातही आरोपीविरुद्ध कारवाई सुरू असून, आरोपीने कबूल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे संबंधित प्रकरणात त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही नवीन अटक करण्यात आलेली नसून आरोपीला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार रावसाहेब नानासाहेब गोडका (वय 55, रा. पिंपळवाडी रोड, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये अशोककुमार एकनाथ खरात (नाशिक), कल्पना अशोककुमार खरात (वय 49, नाशिक, फरार), किरण भाऊसाहेब सोनवणे (वय 42, निमगाव, ता. राहाता), अरविंद पांडुरंग बाबके (वय 59, ता. राहाता) आणि अशोक प्रभात तांबे यांचा समावेश आहे. यांपैकी आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांना 31 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ऑगस्ट 2023 पासून शिर्डी, राहाता आणि नाशिक परिसरात हा प्रकार सुरू असल्याचा आरोप तपासातून समोर आला आहे.

Impostor Ashok Kharat in custody of Shirdi police

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

7 minutes ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

14 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

19 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

23 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

28 minutes ago

मधमाशी : जीवसृष्टीतील सर्वोत्तम वरदान

आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…

33 minutes ago