एकीकडे भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारत तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला. त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जींनाही मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांची सत्तेसोबत आमदारकीही गेली आहे. भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,111 मतांनी पराभव केला.
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शुभेंदु अधिकारी यांनी त्यांच्या सहकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. ममता बॅनर्जींचा पराभव होणे गरजेचे होते. हा विजय बंगालच्या एकजुटीचा असल्याची प्रतिक्रिया शुभेंदु अधिकारी यांनी दिली.
तृणमूल काँग्रेससमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे पक्षाच्या नेत्यांवर लागलेले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. तळागाळातील कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्यांकडून घेतल्या जाणार्‍या ‘कट मनी’मुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाला पैसे द्यावे लागणे, ही बाब ममता बॅनर्जींच्या लोकप्रियतेला ओहोटी लावत आहे. ममता बॅनर्जींची मोठी शक्ती ‘महिला मतदार’ मानली जाते. मात्र, संदेशखळी सारख्या घटनांमुळे या शक्तीला तडे गेले आहेत. स्थानिक तृणमूल नेत्यांकडून महिलांचे होणारे शोषण आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार समोर आल्यानंतर, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ज्या महिलांनी 2011 मध्ये ममतांना सत्तेवर बसवले, त्याच महिला आता रस्त्यावर उतरून विरोध करताना दिसत आहेत. जुन्या फळीतील नेत्यांमध्ये नाराजी आहे. पक्षात केवळ घराणेशाहीला महत्त्व दिले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागली आहे. बंगालमध्ये मुस्लिम मतपेढी ही तृणमूलची हक्काची व्होट बँक राहिली आहे. मात्र, आता तिथेही समीकरणे बदलत आहेत. ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ सारख्या पक्षांच्या उदयामुळे आणि काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीमुळे मुस्लिम मतांचे विभाजन होत आहे.

Mamata Banerjee defeated in Bhawanipur

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

21 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

40 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

47 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

56 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago