नाशिक

साधूच्या वेशात आलेल्यांनी वृद्धाला भुरळ पाडून सोन्याची चेन, अंगठी लांबविली

सिडको : प्रतिनिधी
साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी वृद्धाला भुरळ पाडून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठी लांबविल्याची घटना आडगाव शिवारात घडली. या प्रकरणी नरेंद्र हेरंबाजी कामनवार (वय 69, रा. पार्कसाइड होम्स, हनुमाननगर, आडगाव शिवार) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कामनवार हे रायते हॉस्पिटलजवळून बळी मंदिर रोडकडून पार्कसाइड नेस्ट इमारतीकडे पायी जात होते. त्यावेळी पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून दोन जण तेथे आले. त्यातील एक जण कारचालक असून, त्याचे वय अंदाजे 35 ते 45 वर्षे आहे.
दुसरा इसम साधूच्या वेशात असून, त्याचे वय अंदाजे 40 ते 50 वर्षे आहे. त्याने अंगाला राख लावलेली होती.
साधूच्या वेशातील इसमाने आपण साधू असल्याचे सांगून कामनवार यांच्या डोक्यावर हात फिरविला. त्यानंतर त्यांना भुरळ पाडून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर दोघेही कारमधून पसार झाले.
चोरट्यांनी लांबविलेल्या ऐवजामध्ये सुमारे 60 हजार रुपये किमतीची, दीड तोळे वजनाची ओमचे लॉकेट असलेली सोन्याची चेन आणि 20 हजार रुपये किमतीची, पाच ग्रॅम वजनाची बदामाच्या आकाराची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

Impostors posing as sadhus beguiled an elderly man and made off with his gold chain and ring.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago