नाशिक

कुंभमेळ्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष

2 कोटी 17 लाखांची फसवणूक 

सिडको : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी हाउसकीपिंगचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 2 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने दोघांना जामनेर येथून ताब्यात घेतले. तनय अनंत महाजन (वय 32) आणि नरेंद्र तोताराम महाजन (वय 51) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2027-28 मध्ये होणार्‍या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील कामांची बनावट यादी तयार करण्यात आली होती. तसेच भारत सरकारची राजमुद्रा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अथॉरिटी या नावाचा बनावट मजकूर, संबंधित अधिकार्‍याची डिजिटल स्वाक्षरी आणि नाशिक महापालिकेच्या टेंडर नोटीसचा क्रमांक असल्याचे भासविणारी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.
ही बनावट कागदपत्रे दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर हाउसकीपिंगचे वर्क ऑर्डर मिळवून देण्याचे आश्वासन देत बनावट वर्क ऑर्डर तयार करून फिर्यादीला देण्यात आली. या माध्यमातून फिर्यादीकडून तब्बल 2 कोटी 17 लाख 50 हजार रुपये घेण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शकील अहमद सलीमुद्दीन शेख, तनय महाजन आणि नरेंद्र तोताराम महाजन यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत. मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक झाल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-1 व गुंडाविरोधी पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने जामनेर येथे कारवाई करून तनय अनंत महाजन आणि नरेंद्र तोताराम महाजन यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांना पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात
आले आहे.

नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर; 3 कोटींची फसवणूक, दोघांना जळगावहून अटक करण्यात आली आहे. गोदावरी काठावर होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करून मोठी आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट समोर आले आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा मंत्री गिरीश महाजन यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही. यापूर्वी देखील त्यांनी जामनेर मध्ये असेच लोकांची फसवणूक केलेली आहे. तो नशेच्या आहारी गेलेला असून त्यांना दारूचे व्यसन जडलेलं आहे. त्यांच्या या उद्योगामुळे सदर तरुणांने आपल्या कुटुंबियांना देखील त्यांनी रस्त्यावर आणलेले आहे, शेतजमीन विकावी लागलेली आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे यापूर्वीच निर्देश पोलीस विभागाला दिले आहेत.
– मंत्री गिरीश महाजन

यांनी केली कारवाई

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, रमेश शिंदे, तसेच पोलिस कर्मचारी प्रवीण वाघमारे, विशाल काठे, मुश्रीफ शेख, नाझीमखान पठाण, मिलिंदसिंग परदेशी, महेश साळुंके, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, सुनील भोसले, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, समाधान पवार, दीपक दिवटे, अविनाश देवरे, राजेश राठोड, संदीप भुरे, गणेश भागवत, गुरू गांगुर्डे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक जया तारडे यांच्या
पथकाने केली.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago