नाशिक

त्र्यंबकेश्वरमध्ये महिलांचे मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरूच

बसस्थानकावर पोलिसांचा वचक नसल्याने संताप

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर
त्र्यंबकेश्वर येथे एकादशीच्या वारीसाठी येणार्‍या महिला भाविकांना लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन महिलांचे लाखो रुपयांचे मंगळसूत्र लांबवल्याच्या घटना
घडल्या आहेत.
एकाच दिवशी दोघींची लूटमार
पहिली घटना : नाशिक येथील नंदा बाळासाहेब शिंदे (वय 52) बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 21 ग्रॅमची सोन्याची शॉर्ट पोत
साखळी लांबवली.
दुसरी घटना : निफाड तालुक्यातील ओझरमिग येथील बबिता मनोहर कर्पे (वय 54) या सीएनजी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिन्यांत 10 घटना!
1 जून ते 10 ऑगस्टदरम्यान सोनसाखळी चोरीच्या तब्बल 10 फिर्यादी नोंदवल्या गेल्या आहेत.

दुर्लक्ष अन् स्थानिकांचे प्रश्न

त्र्यंबकेश्वर बसस्थानकावर राज्य परिवहन महामंडळाने अद्याप आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. कुशावर्त कुंडावर स्नानासाठी आलेल्या भाविकांचे कपडे आणि पाकिटे घेऊन पळून जाणारे चोरटेही वर्षभर सक्रिय असतात. वारंवार घटना घडूनही पोलीस यंत्रणेकडून कडक पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना महिलांनी कष्टाने घेतलेले दागिने चोरीला गेल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांनी तत्काळ विशेष मोहीम हाती घेऊन मंदिर परिसर, कुशावर्त कुंड आणि बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Spree of Mangalsutra thefts targeting women continues in Trimbakeshwar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago