नाशिक

वसाका बंद पाडण्यास जबाबदार असणार्‍यांवर लोकप्रतिनिधींनी कारवाईची मागणी का केली नाही?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा सवाल

देवळा ः प्रतिनिधी
कसमादे परिसराचे वैभव असलेला वसाका बंद पाडण्यास जबाबदार असणार्‍यांवर आजपर्यंत कार्यक्षेत्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कुठल्याही कारवाईची मागणी का केली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते उदयकुमार आहेर यांनी उपस्थित केला. येथील आमदार, खासदारांनी शासन स्तरावर हा प्रश्न उपस्थित करत कर्जाच्या खाईत गेलेला वसाका पुन्हा सुरू करावा, अशी मागणी रविवारी (दि.15) येथील पत्रकार परिषदेत केली.
वसाका सुस्थितीत असताना अनेक आरोप-प्रत्यारोप करत अनेकांनी सत्ताकेंद्रे हस्तगत करत उपभोगली. मात्र, हे होत असताना वसाका बंद पाडण्यास तसेच वसाकाच्या दुरवस्थेस कारणीभूत कोण, याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. कारण या बंद पडलेल्या वसाकामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, परिसरातील उद्योग-व्यवसाय ओस पडू लागले आहेत. वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी आपले वजन खर्च करावे. शिखर बँकेच्या माध्यमातून वसाकावरील असलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची जबाबदारी शासनाला देऊन शासनामार्फत कारखान्याला कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा आपण सर्व घटकांना सोबत घेऊन वसाकाची चाके पुन्हा फिरती होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शासनाच्या वतीने वसाकाचे पालकत्व स्वीकारण्याची गळ घालू, असे सांगितले. कर्जबाजारी झाल्यामुळे कारखाना विक्रीस काढणे हा पर्याय होऊ शकत नाही आणि तो जास्त दिवस बंदही ठेवता येणार नाही. यासाठी विशेषतः सभासदांनी, कामगारांनी, तसेच युवावर्गाने वसाका सुरू होण्यासाठी प्रयत्नशील व्हावे, असे आवाहन केले. आपण स्वतः वसाकाची चाके पुन्हा फिरण्यासाठी आग्रही मागणी करणार आहोत. गेले अनेक दिवस वसाकासंदर्भात आंदोलने झाली. अनेक बैठका पार पडल्या. मात्र, लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago