केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईत भत्त्यात वाढ

 

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे . ही वाढ एक जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती आहे . केंद्र सरकार महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करणार आहे . सरकारकडून महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे . पाच टक्क्यांची वाढ झाल्यास पगारात जवळपास ३४००० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे . केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ ९ टक्के इतका होणार . केंद्र सरकाकडून दरवर्षी दोन वेळेस महागाई भत्त्यात वाढ केली जाते . साधारणपणे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते . वर्ष २०२२ च्या सुरुवातीचला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये महागाई निर्देशांकात घट झाली असल्याचे दिसून आले होते . त्यानंतर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *