चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू

डोक्याला गंभीर दुखापत, खून झाल्याचा संशय

सिडको: वार्ताहर

शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसून सिडकोतील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून या तरुणाचा मित्रांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे समजते त्यामुळे मित्रांनी त्याचा घात केला असणचा संशय व्यक्त होत आहे

डॉ. हेडगेवार नगर त्रिमूर्ती चौक परिसरातील कैलास बाबुराव साबळे वय (45) वर्ष यांचे राहते घरी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली याप्रकरणी अंबड पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे. सविस्तर वृत्त असे की मयत साबळे यांचा कॅनडा कॉर्नर परिसरात परिसरात चायनीज गाडीचा व्यवसाय असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांना मित्राने घरी पोहोचविले होते साबळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्या जखमेवर हळद लावली होती रात्री घरी आल्यानंतर ते झोपी गेले असता सकाळी दहा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यासह अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली असून अंबड पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्युची नोंद केली आहे .त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच पुढील तपासानंतर पोलिस पुढील काय कारवाई करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *