महासत्ता नव्हे, भारत विश्वगुरू सरसंघचालक भागवत यांचे कॅनडात वक्तव्य

टोरोंटो :
राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालक मोहन भागवत नुकतेच अमेरिकेच्या दौर्‍यावर होते. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील त्यांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत विरोध झाला होता. त्यामुळे मोहन भागवत यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत राहिला. न्यूयॉर्कनंतर भागवत यांचा कॅनडामध्येही एक कार्यक्रम पार पडला आहे. कॅनडाच्या टोरोंटो येथे आयोजित ‘हिंदू विश्व बंधू’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.
टोरोंटो शहरातील कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी भारताच्या एकजुटीवर, हिंदुत्वावर, भारताची मदत करण्याची परंपरा, भारताची विविधता आणि जागतिक मैत्री अशा विविध मुद्यांवर मोठं भाष्य केले आहे. ‘भारत महासत्ता नाही, तर विश्वगुरू बनला’, असे महत्त्वाचे वक्तव्य यावेळी त्यांंनी केले. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा अर्थही त्यांनी सांगितला.
भारताने जगावर आपला प्रभाव ‘महासत्ता’ म्हणून कधीही निर्माण केला नाही, तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावामुळे आणि मानवतेच्या सेवेमुळे तो ‘विश्वगुरू’ बनला. भारताला कोणी महासत्ता म्हणू शकेल, पण तो तसा नव्हता. भारताने जगाची सेवा केली आणि आपल्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे तो विश्वगुरू बनला, महासत्ता नाही, असे भाष्य भागवत यांनी केले आहे.

India is a ‘Vishwaguru’ (World Teacher), not merely a superpower: Sarsanghchalak Bhagwat’s statement in Canada.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *