आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांना सुवर्णपदक

नवी दिल्ली : प्रतिनिधी
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक होते. सुवर्णपदकविजेत्या भारतीय संघात किरण, मचेत्तिरा पूवम्मा, प्राची आणि विथ्या रामराज यांचा समावेश होता. भारतीय संघाने ही शर्यत 3:29.69 मिनिटांत पूर्ण केली. सहाव्या सुवर्णपदकासह भारताने पदक तालिकेत 10 वे स्थान पटकावले आहे. एकूण पदकांची संख्या 51 झाली आहे. यामध्ये 6 सुवर्ण, 21 रौप्य आणि 24 कांस्य पदकांचा समावेश आहे.
बहरीन संघाने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावून रौप्यपदक जिंकले. चीन संघाने तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक मिळवले. दरम्यान, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. यामध्ये भारतीय महिलांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. भारताला एकूण 6 सुवर्णपदक आत्तापर्यंत मिळाले आहेत.
भारताने क्रिकेट, कबड्डी आणि नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आता अ‍ॅथलेटिक्समध्येही सुवर्णपदकाची भर पडली आहे. यासह भारताने पदक तालिकेत 50 चा आकडा पार केला आहे. धावपटू वित्या रामराजचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे दुसरे पदक होते. यापूर्वी तिने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. आता तिने सुवर्णपदकही पटकावले आहे. स्पर्धेदरम्यान पाऊस पडत होता, तरीही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पावसामुळे त्यांना कोणताही अडथळा आला नाही. अनेकदा पावसात धावताना खेळाडूंना अडचणी येतात.

धावपटू गुलवीर सिंगला तिसरे पदक
धावपटू गुलवीर सिंग याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत देशाच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुषांच्या 5,000 मीटर धावण्याच्या चुरशीच्या शर्यतीत सर्वोत्तम वेग आणि रणनीतीचे दर्शन घडवत गुलवीरने कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मातब्बर धावपटूंशी कडवी झुंज देत त्याने हे यश संपादन केले. या कामगिरीमुळे एकाच आशियाई क्रीडा
स्पर्धेत ट्रॅक इव्हेंटमध्ये पदकांची हॅटट्रिक नोंदवणारा तो भारताचा आघाडीचा खेळाडू ठरला आहे.

नीरू ढांडाला नेमबाजीत सुवर्ण
भारताची नेमबाज नीरू ढांडा हिने महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. मंगळवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत तिने 30 पैकी 28 अचूक निशाणे साधत नव्या विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत चीनच्या सुन युनोंगने 26 गुणांसह रौप्य, तर कुवेतच्या हजर अब्दुलमलिकने 21 गुणांसह कांस्यपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 75 वर्षांच्या इतिहासात महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी नीरू ही पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.

 

 

Indian women win gold medal at Asian Games

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *