नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, मे महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर वार्षिक आधारावर वाढून 9.68 टक्क्यांवर पोहोचला आहे.
महागाई मोजण्याच्या पद्धतीत करण्यात आलेल्या मोठ्या बदलानंतर ही सुधारित आकडेवारी प्राप्त झाली आहे. याआधीच्या जुन्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात हाच घाऊक महागाई दर 8.26 टक्के इतका नोंदवला गेला होता. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातील हा वाढलेला दर अर्थव्यवस्थेतील वाढत्या किमतींचे संकेत देत आहे. या वाढलेल्या आकडेवारीमागे सरकारने महागाई निर्देशांकात केलेला ऐतिहासिक आणि रचनात्मक बदल कारणीभूत आहे. तब्बल एका दशकाहून अधिक काळानंतर प्रथमच भारताच्या घाऊक महागाई मालिकेमध्ये एवढा मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या धोरणानुसार, देशातील महागाईचे अचूक मोजमाप करण्यासाठी घाऊक किंमत निर्देशांकाचे ’आधारभूत वर्ष’ 2012 वरून अद्ययावत करून आता 2023 करण्यात आले आहे. मागील दहा-बारा वर्षांतील अर्थव्यवस्थेतील बदल, नवीन उत्पादनांचा समावेश आणि बाजारातील बदलती गती अधिक अचूकपणे टिपण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
Inflation flares up in the country; rises to 9.68 percent.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…