नाशिक

एकल महिला पुनर्विवाह उपक्रम कौतुकास्पद

आ. फरांदे : नवचेतना अभियानांतर्गत वधू-वर परिचय मेळावा

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषद, नाशिकच्या नवचेतना अभियानांतर्गत पुनर्विवाह करू इच्छिणार्‍या एकल महिला व पुरुषांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वजातीय राज्यस्तरीय पुनर्विवाह वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद इमारतीत मेळावा आयोजित करण्यात आला होता.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सहभागी महिला व पुरुषांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवून परस्पर परिचय साधला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद नाशिकच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. समाजातील एकल महिला व पुरुषांना नव्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. जिल्हा परिषद नाशिक सामाजिकदृष्ट्या अतिशय चांगले आणि लोकाभिमुख उपक्रम राबवत असून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत एक सकारात्मक व प्रेरणादायी ठसा उमटवत आहे. नवचेतना अभियानाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी सुरू असलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवचेतना अभियानांतर्गत आयोजित हा दूसरा पुनर्विवाह वधू-वर परिचय मेळावा असून, एकल महिला व पुरुषांना नव्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) प्रताप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डॉ. वर्षा फडोळ, समाजरत्न नानजीभाई ठक्कर ठाणावाला, यांच्यासह महिला व बालविकास विभागातील अधिकारी, पर्यवेक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. साऊ एकल महिला समितीचे राज्य प्रतिनिधी अशोक कुटे यांनी उपस्थित वधू-वरांचे बायोडाटा वाचन केले. त्रिलोक भामरे यांनी सूत्रसंचालन केले.

Initiative for remarriage of single women is praiseworthy.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago