नाशिक

संशयास्पद जन्म-मृत्यू दाखल्यांची आजपासून छाननी

सहा पथकांवर जबाबदरी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील संशयास्पद वाटणार्‍या 18 हजार 268 दाखल्यांची छाननी मंगळ्वारी पासून (दि. 23) होणार आहे. दरम्यान, याकरिता प्रशासनाने सहा पथकांवर याची जबाबदारी सोपवली आहे. महिनाभरात सदर काम मार्गी लावले जाणार आहे.
छाननीदरम्यान संशयास्पद बाब, बनावट कागदपत्रे किंवा नियमबाह्य दुरुस्ती आढळल्यास, त्याची स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे. ही सर्व पथके पुढील महिनाभरात आपला सविस्तर चौकशी अहवाल थेट मनपा आयुक्तांकडे सादर करणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या चौकशीत गंभीर अनियमितता किंवा बनावटगिरी आढळून आल्यास ती संबंधित प्रकरणे पुढील कडक कारवाईसाठी थेट पोलिसांकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेच्या प्राथमिक नोंदीनुसार, शहरातील पूर्व आणि नाशिकरोड विभागामध्ये सर्वाधिक दुरुस्त्या झाल्याचे समोर आले आहे. त्यात नाशिकरोड विभागात चार हजार 656 पूर्वत 4 हजार 554, पंचवटी 2 हजार 322, नवीन नाशिक 1 हजार 396, सातपूर 1 हजार 291, व इतर विभाग 3 हजार 549 दाखल्यांचा त्यात समावेश आहे.
या तपासणीसाठी महापालिकेने सहा विशेष पथके नियुक्त केली. सोमवारीच त्यांना यासंदर्भात मार्गदर्शक सूचना व आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांत गेल्या काही काळात झालेल्या मोठ्या प्रमाणातील दुरुस्त्यांच्या पार्श्वभूमीवर चौकशीला वेग आला आहे. वैद्यकीय विभागाने गठित केलेल्या या सहा विशेष चौकशी पथकांमध्ये विभागीय अधिकारी, विभागीय वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि बहुउद्देशीय सेवकांचा समावेश आहे. हे प्रत्येक पथक आपापल्या विभागातील दाखल्यांमधील दुरुस्त्यांची बारकाईने पडताळणी करणार आहे.

नावातील बदलामागील कारणे शोधली जाणार
नाव, आडनाव, जन्मतारीख किंवा इतर तपशिलांमध्ये झालेल्या बदलांमागील नेमकी कारणे आणि त्यासाठी अवलंबलेली प्रक्रिया कायदेशीर होती की नाही, याची कसून चौकशी केली जाणार आहे.

Scrutiny of suspicious birth and death certificates begins today.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago