बारा जणांना अटक, 5 फरार, 19.55 लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांंनी महामार्गांवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या केरळमधील आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात 19.55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणखी पाच आरोपी फरार आहेत
दि. 11 डिसेंबर 2025 रोजी वाडीवर्हे पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-आग्रा महामागार्र्वरील राजूर पाटी परिसरात गुजरात येथील फिर्यादी
धर्मेंद्र पटेल व त्यांचे सहकारी स्कॉर्पिओ कारमधून प्रवास करत असताना अज्ञात आरोपींनी संगनमताने त्यांची गाडी अडवली. फिर्यादीस मारहाण करून डोळ्यांत काहीतरी टाकून बेशुद्ध करण्यात आले व कारमधील चार लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटण्यात आली. याप्रकरणी वाडीवर्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वाडीवर्हे पोलीस ठाण्याची पथके सक्रिय झाली. फॉरेन्सिक पथक, श्वानपथक व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी केरळ राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. परराज्यात तपासाची परवानगी घेऊन केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात छापे टाकून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पुन्हा नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने सिन्नर तालुक्यात छापा टाकून आणखी दहा आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तलवार, गुप्ती, कोयता, चाकू, हातोडे, स्क्रू-ड्रायव्हर, मिरचीपूड, तीन चारचाकी वाहने, मोबाईल फोन, एटीएम व क्रेडिट कार्ड, असा एकूण 19 लाख 55 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. तसेच आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात हे आरोपी केरळमधील सराईत गुन्हेगार असून, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील महामार्गांवर लूटमार केल्याचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Interstate robbery gang caught by rural police
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…