अवघ्या 2 तासांत वाडीवर्हे पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
अस्वली स्टेशन : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात अनिल एकनाथ गिर्हे (रा. गिर्हेवाडी, पिंपळगाव घाडगा, ता. इगतपुरी) या युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोन तासांत संशयितांना बेड्या ठोकल्या.
वाडीवर्हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, पोलीस हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज येशी, भगवान खरोले, धोंडिराम बोंबले, विशाल सोनवणे यांनी दोन तासांत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी वाडीवर्हे पोलिसांचे कौतुक केले आहे. खुनाच्या घटनेत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांनीही कौतुक केले आहे.
अधिक माहिती अशी की, भाडेकरू महिला मंगल वाळू मधे हिचा मोठा भाऊ अजय रंगनाथ पवार व भावजय काजल अजय पवार आठ दिवसांपूर्वी पिंपळगाव डुकरा येथे आले होते. मृत अनिल गिरे व आरोपी अजय पवार हे दोघे रोज एकत्र बसायचे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास काजल पवार हिने मंगलला सांगितले की, अनिल गिर्हे आणि अजय पवार हे घरी आल्यानंतर पती मला बोलले की, अनिलची तुझ्यावर वाईट नजर आहे. त्यामुळे त्यांच्यात आपसात भांडण चालू झाले आहे. माझे पती रागाच्या भरात काहीतरी करतील. तुम्ही लवकर घरी चला. दोघी घरी आल्यावर अनिल एकनाथ गिर्हे हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. वाडीवर्हे पोलिसांनी अजय रंगनाथ पवारचा परिसरात शोध घेतला. तो एका अंडा भुर्जीच्या गाड्याच्या आडोशाला अंधारात दारूच्या नशेत लपून बसलेला मिळाला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्याने मृत अनिल गिर्हे याची माझ्या बायकोवर वाईट नजर होती. त्यामुळे त्याच्याशी गोड बोलून दारू पाजून बहीण मंगल मधेच्या घरी आणून घराच्या मोरीत ठेवलेल्या दगडाने त्याला ठेचून मारल्याचे कबुली दिली. याप्रकरणी अधिक तपास वाडीवर्हे पोलिस करीत आहेत.
Youth murdered in Pimpalgaon Dukra Shivara
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…