होर्मुझसाठी ट्रम्प यांचा 48 तासांचा अल्टिमेटम, संघर्षाला नाट्यपूर्ण नवे वळण
तेहरान :
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वांत मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील ‘डिमोना’ आणि ‘अराड’ या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान 180 जण जखमी झाले. इराणने हा हल्ला इस्रायलने त्याच दिवशी केलेल्या ‘नतान्झ’ आण्विक केंद्रावरील हल्ल्याची ‘प्रतिक्रिया’ असल्याचे जाहीर केले. या युद्धात प्रथमच इराणची क्षेपणास्त्रे इस्रायलच्या अणुऊर्जा केंद्राच्या परिसरातील हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यात यशस्वी ठरली. हे या संघर्षाचे नाट्यपूर्ण नवे वळण आहे.
डिमोना हे शहर इस्रायलच्या ‘शिमोन पेरेझ नेगेव्ह न्यूक्लिअर रिसर्च सेंटर’पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. या शहरात जगभरातून स्थलांतरित झालेल्या भारतीय यहुद्यांची मोठी वस्ती असल्याने त्याला ‘मिनी-इंडिया’ असेही
म्हटले जाते.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी या हल्ल्याला ‘युद्धगुन्हा’ संबोधत जगभरातील नेत्यांना अमेरिका-इस्रायलच्या इराण विरोधी युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले. जर इराण संपूर्ण जगाला धोका निर्माण करतो याचा पुरावा हवा असेल, तर गेल्या 48 तासांनी तो दिला आहे, असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) डिमोनाच्या अणुकेंद्राला कोणतीही इजा झाली नाही व किरणोत्सर्गाची पातळी सामान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव आणखी विस्फोटक बनला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी उशिरा इशारा दिला की, इराणने 48 तासांत होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास अमेरिका इराणचे विद्युत केंद्र उद्ध्वस्त करेन.
Iran attacks Mini India in Israel
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…