सरकारच्या प्रमुखपदी सर्वाधिक काळ
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात ऐतिहासिक टप्पा गाठला असून, ते देशातील निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक काळ सेवा करणारे प्रमुख ठरले आहेत. या कामगिरीसह त्यांनी पवनकुमार चामलिंग यांचा विक्रम मोडला आहे. चमलिंग यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून 8 हजार 930 दिवस कार्य केले होते. पंतप्रधान मोदी यांनी आता गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून मिळून एकूण 8 हजार 931 दिवसांची सेवा पूर्ण केली आहे. अशा स्थितीत ते नेतृत्वाच्या भूमिकेत 25व्या वर्षात प्रवेश करत आहेत.
विशेष म्हणजे, टप्पा अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचा मानला जात असून, दीर्घकाळ अखंड सार्वजनिक सेवा आणि उच्चस्तरीय राजकीय नेतृत्वाचं प्रतीक मानले जात आहे. आपल्या कारकिर्दीत मोदींनी अनेक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यात गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम तसेच, मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिकपूर्वअनुभव असलेले पंतप्रधान होण्याच्या विक्रमांचा समावेश आहे.
मोदी यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत स्वातंत्र्यानंतर जन्मलेले भारताचे पहिले पंतप्रधान म्हणूनही नोंद केली आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. यासोबतच मोदींनी 2014, 2019 आणि 2024 या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून सातत्यपूर्ण जनसमर्थन आणि दीर्घकालीन राजकीय नेतृत्व सिद्ध केलं आहे.
Prime Minister Modi created history
नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…
तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…
रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…
पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…
अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…