इराणने जगाला दिला धक्का; भूमिगत ‘मिसाइल सिटी’चे प्रदर्शन

एकाच वेळी दोन द्रव इंधन क्षेपणास्त्रे डागू शकणार्‍या नव्या ड्युअल मिसाइल लॉन्चरचे अनावरण

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धाच्या पाश्वर्र्भूमीवर, इराणने आपली भूमिगत ‘मिसाइल सिटी’ जगासमोर आणली आहे. एकाच वेळी दोन द्रव इंधन क्षेपणास्त्रे डागू शकणार्‍या नव्या ड्युअल मिसाइल लॉन्चरचे अनावरण केले आहे. इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी आणि फार्स वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)चे प्रमुख मेजर जनरल अहमद वाहिदी आणि एरोस्पेस फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनरल सय्यद माजिद मौसावी हे भूमिगत बोगद्यांतील या सुविधेची खुल्या वाहनातून पाहणी करताना दिसत आहेत, जिथे बोगद्यांमध्ये रांगेने क्षेपणास्त्रे, सुधारित क्षेपणास्त्रे आणि प्रगत लॉन्चर साठवलेले दिसत आहेत. हे ठिकाण नेमके कुठे आहे, हे इराणने उघड केलेले नाही, पण सरकारी दूरचित्रवाणीने त्याला आयआरजीसीच्या दहा किंवा कदाचित शेकडो मिसाईल सिटीजपैकी एक असे म्हटले आहे.
या नव्या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे, आधी इराणकडे दोन घन-इंधन क्षेपणास्त्रे एकाच वेळी डागणारा ड्युअल लॉन्चर होता, आता त्यापेक्षा पुढे जात दोन द्रव इंधन क्षेपणास्त्रे एकाच वेळी डागता येतील. द्रव इंधन अधिक कार्यक्षम असते आणि त्यामुळे क्षेपणास्त्राचा वेग आणि मार्ग काही प्रमाणात नियंत्रित करता येतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या अनावरणावेळी जनरल मौसावी यांनी दावा केला की, दोन युद्धांमधील काळात आमच्या एरोस्पेस क्षमता लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. आम्ही लढाऊ रचनेत ‘आश्चर्ये’ आणि अत्यंत प्रभावी साधने समाविष्ट केली आहेत, शत्रूसाठी युद्धभूमीवर नवी शस्त्रे वाट पाहत आहेत, तर जनरल वाहिदी यांनी शत्रूने जे पाहिले ते फक्त सुरुवात होती, असा इशाराही दिला.
अमेरिकेला थेट आव्हान
या प्रदर्शनामागचा स्पष्ट उद्देश म्हणजे, अमेरिकेने इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त केला आहे, असा केलेला दावा खोटा ठरवणे आणि इराणची हल्ला करण्याची क्षमता अजूनही शाबूत असल्याचे दाखवणे. हे सर्व अशा वेळी घडले आहे, जेव्हा जून 2025 मधील 12 दिवसांचे युद्ध आणि 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेले दुसरे युद्ध यानंतर अमेरिका-इराण वाटाघाटी रखडल्या आहेत.

Iran shocks the world; unveils underground ‘missile city’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *