इराण-अमेरिका संघर्ष पेटला

अमेरिकेचे दुर्मिळ ‘अवाक्स’ विमान उद्ध्वस्त

तेहरान/वॉशिंग्टन :
पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला असून, इराणने सौदी अरेबियातील ’प्रिन्स सुल्तान एअर बेस’वर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या कारवाईत अमेरिकन हवाई दलाचे अत्यंत दुर्मिळ आणि मोक्याचे ’ई-3 सेंट्री अवाक्स’ विमान पूर्णपणे नष्ट झाले. संपूर्ण अमेरिकन ताफ्यात शिल्लक असलेल्या केवळ 16 या विमानांचा नाश होणे, हा अमेरिकेसाठी मोठा धोरणात्मक धक्का मानला जात आहे. कारण हे विमान शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल तेहरानवर हवाई हल्ले करण्यात आले, ज्यात इराण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका व इस्रायलने इराणच्या अणुकेंद्र आणि लष्करी तळांवर केलेल्या कारवाईपासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत 2,000 हून अधिक इराणी नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिस्थिती चिघळत असतानाच इराणच्या ’आयआरजीसी’ने अमेरिकेला निर्वाणीचा अल्टिमेटम दिला आहे. अमेरिकेने 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या आक्रमक कृतीचा निषेध नोंदवावा, अशी मागणी इराणने केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास पश्चिम आशियातील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित असलेल्या विद्यापीठांवर हल्ले ’डबल इंजिन’ सरकार बहुमताने सत्तेत येईल. घुसखोरी रोखण्यात आलेले यश, उग्रवादाचा पूर्णपणे झालेला अंत आणि चहा निर्यातीसाठी केंद्र सरकारने केलेले आंतरराष्ट्रीय करार यांमुळे आसामची अर्थव्यवस्था बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसच्या काळात आसाममध्ये हिंसाचार आणि आंदोलने होती, पण आज भाजपच्या काळात आसाम विकासाचे केंद्र बनले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.
राज्यातील 126 जागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत भाजपने ’आसोम गण परिषद’ (एजीपी) सोबत युती केली असून, त्यांच्यासमोर गौरव गोगोईंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीचे मुख्य आव्हान आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या प्रशासकीय कामगिरीचा उल्लेख करत शाह यांनी स्पष्ट केले की, भाजपने 1.26 लाख एकर जमीन घुसखोरांच्या तावडीतून मुक्त केली आहे. ’विकसित आसाम’ आणि ’सुरक्षित आसाम’ या मुद्द्यांवर भाजप पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन करेल, असा ठाम विश्वास त्यांनी या दौर्‍याच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.

Iran-US conflict flares up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *