विशिष्ट मक्तेदाराला लाभ देण्यासाठीचे प्रयत्न?
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने 34 प्रकारची अत्याधुनिक जीवितरक्षक उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. बारा कोटींच्या या निविदेत मात्र कमालीचा घोळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विशिष्ट ठेकेदाराला लाभ देण्यासाठी तर हा प्रयत्न नाही ना? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
निविदेत सुट्या उपकरणांच्या पुरवठ्यासाठी अग्निशमन वाहने बनवणारा उत्पादक असण्याची अट घातल्याने ही निविदा ठराविक कंत्राटदारासाठी सोयीची केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. निविदेतील अनुक्रमांक 22 वर इलेक्ट्रिकल चेन सॉ (विजेवर चालणारी लाकूड कापण्याची करवत) मागितली आहे. मात्र, तिच्या तांत्रिक निकषांत 75 सीसीचे टू-स्ट्रोक पेट्रोल इंजिन आणि 0.70 लिटर पेट्रोल टाकीची अट टाकण्यात आली आहे. अनुक्रमांक 13 ला 9 लिटर क्षमतेचे वॉटर सीओटू अग्निशमन यंत्र मागवले असताना, त्याचे निकष मात्र 4.5 किलो सीओटू टाइप यंत्राचे छापले आहे. तसेच सहा किलो पावडर यंत्राच्या वर्णनात 20 लिटर लिक्विड फोमचे निकष घुसडले आहेत. तब्बल 15 किलोमीटर लांबीच्या (15,000 मीटर) विविध नायलॉन/पॉलीप्रॉपिलीन दोर्या (रस्स्या) खरेदी केल्या जाणार आहेत. निविदेत लाइफ जॅकेट, बोट, स्ट्रेचर, फायर एक्स्टिंग्विशर, सर्च लाइट अशी 34 सुटी उपकरणे खरेदी करायची आहेत. असे असतानाही मक्तेदार किमान दहा वर्षे जुना अग्निशमन वाहने बनवणारा उत्पादक असावा आणि त्याने 25 वाहने पुरवलेली असावीत, अशी अट घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर बिलांच्या अटींमध्ये चक्क चेसीस पुरवठ्याचे पेमेंट असा उल्लेख राहून गेला आहे. यावरून ही निविदा तयार करताना अधिकार्यांनी जुन्या वाहन खरेदीच्या निविदेचा मसुदा जसाच्या तसा वापरल्याचे उघड झाले आहे.
आयुक्त लक्ष घालणार?
अग्निशमन दलासारख्या अत्यंत संवेदनशील विभागाच्या खरेदी प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्याने भविष्यात निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवले जाण्याचा किंवा तांत्रिक कारणे दाखवून स्पर्धा मर्यादित ठेवण्याची भीती आहे. याप्रकरणी मनपा आयुक्तांनी लक्ष घालून ही सदोष निविदा रद्द करून दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Irregularities in tender for procurement of firefighting equipment
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री…
पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली नाशिक : प्रतिनिधीं संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत…
विकासकामांना जुन्या देयकांचा विळखा; लोकप्रतिनिधी आक्रमक नाशिक : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीत (डीपीसी) नाशिक जिल्ह्यासाठी…
गिरीश महाजनांनी संभ्रमाचा पडदा दूर केला नाशिक : प्रतिनिधी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत पक्षाचा प्रोटोकॉल मोडल्याने…
लोकसभेच्या जागा 543 वरून 816 होणार ♦ डीलीमिटेशन, महिला आरक्षणाशी जोडलेल्या बहुचर्चित घटनादुरुस्ती विधेयकाला नवा…