नाशिक

मनपा निकालानंतर नाशिक बाजार समिती बरखास्त होण्याची शक्यता?

शेतकरी, व्यापार्‍यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक बाजार समितीचे चालू आर्थिक वर्षातील उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सात कोटी रुपयांनी घटले आहे. शेतकरी व व्यापार्‍यांकडून वाढत्या तक्रारी आल्याने बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक दौर्‍यात आयोजित बैठकीत दिले. त्यामुळे लवकरच समिती बरखास्त होऊन प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी
दिले आहेत.

गेल्या वर्षी नाशिक बाजार समितीत नाट्यमय सत्तांतर झाले होते. चेअरमनपदी कल्पना चुंभळे यांची बहुमताने निवड झाली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात पहिल्या दिवसापासूनच भ्रष्टाचार झाल्याचे आरोप माजी खासदार व माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी केले. गेल्या वर्षभरात बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न सुमारे पंचवीस कोटींवरून अठरा कोटी रुपयांपर्यंत घसरले असून, ही घट सुमारे सात कोटी रुपयांची आहे. समितीतील शेतकरी व व्यापार्‍यांनी कारभाराबाबत अनेक तक्रारी राज्य सरकारकडे केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी नाशिक दौर्‍यात स्पष्ट केले. या निर्णयामुळे शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये समाधानाचे
वातावरण आहे.

बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झाली आहे. समिती भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. वाढत्या भ्रष्टाचाराबाबत शेतकरी, व्यापार्‍यांसोबत मीही राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून, लवकरच प्रशासकाची नेमणूक होणार आहे. त्यामुळे डबघाईस आलेल्या समितीचा लौकिक पुन्हा कायम राहील.
– देवीदास पिंगळे,
माजी सभापती

विविध औद्योगिक व व्यापारी संघटनांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यात नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून भांडत असलेल्या बाजार समितीच्या विषयाकडे ना. रावल यांचे लक्ष वेधून घेतले व दि.20 जानेवारीनंतर बाजार समितीच्या आवाराबाहेर येणार्‍या धान्याच्या गाड्या नाक्यावर थांबणार नाही. बेकायदेशीररीत्या होणारी वसुली बंद करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
– प्रफुल्ल संचेती,
नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना, नाशिक

Is it possible that Nashik Market Committee will be dissolved after the Municipal Corporation results?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago