नाशिक

नायलॉन मांजाचा फास; करकोचा जखमी

महावितरण कर्मचार्‍याची तत्परता, पक्षिमित्रांनी दिले जीवदान

सिन्नर : प्रतिनिधी
नायलॉन मांजाचा वाढता आणि बिनधास्त वापर पशुपक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सिन्नर येथील महावितरण कार्यालयाच्या वीजबिल भरणा केंद्राच्या परिसरात मंगळवारी (दि. 13) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नायलॉन मांजामुळे सफेद मानेचा करकोचा गंभीर जखमी झाला.
या घटनेत करकोचाचा डाव्या बाजूचा पंख नायलॉन मांजेमुळे कापला गेला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. उडता न आल्याने जखमी अवस्थेत असलेल्या या पक्ष्यावर मोकाट कुत्री हल्ला करण्याचा धोका होता. ही बाब लक्षात येताच महावितरण कार्यालयातील वीजबिल भरणा केंद्रावरील कर्मचारी सुनील लांडगे यांनी प्रसंगावधान राखत जखमी करकोचाला सुरक्षितरीत्या पकडले. पंखात अडकलेला नायलॉन मांजा काढून त्यांनी पक्ष्याला कुत्र्यांपासून वाचवले.
यानंतर लांडगे यांनी तत्काळ पक्षिमित्र राहुल कालेवार, शंतनु कोरडे व संदीप साठे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पक्षिमित्रांनी घटनास्थळी धाव घेत जखमी करकोचाला आपल्या ताब्यात घेतले. पुढे या पक्ष्याला वन विभागाच्या कर्मचार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले. तेथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नायलॉन मांजावर कायद्याने बंदी असतानाही शहरात त्याचा वापर खुलेआम सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने विशेष पथके तयार करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

नायलॉन मांजा येतो कुठून?

एकीकडे शहरात नायलॉन मांजा उपलब्ध नसल्याचा दावा केला जात असताना, मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला गल्लोगल्ली उडणार्‍या पतंगांना नायलॉन मांजा वापरला जात असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे हा मांजा नेमका येतो कुठून? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित झाला आहे. नायलॉन मांजामुळे माणसांसह पशुपक्षी जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत असताना, मुलांच्या हाती नायलॉन मांजा देणार्‍या पालकांवरही कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.

Nylon rope noose; Stork injured

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago