नाशिक ः प्रतिनिधी
वसंत पंचमी अर्थात, माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त नाशिकमधील श्री श्री राधा मदन गोपाल (इस्कॉन) मंदिरात शुक्रवारी (दि. 23) वसंतोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरातील विग्रहांची नानाविध फुलांनी विशेष सजावट करण्यात आली होती.
या सजावटीसाठी सुमारे पाचशे किलो झेंडू, शेवंती, सूर्यफूल, ऑर्किड, अॅस्टर, जरबेरा तसेच डच गुलाब आदी विविध फुलांचा वापर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, भगवतांचा संपूर्ण पोशाख हा फुलांपासून साकारण्यात आला असून, मंदिरातील महिला भक्तांनी आपल्या हस्ते ही पुष्पवस्त्रे तयार केली होती. उत्सवासाठी प्रामुख्याने पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला होता. सजावटीसाठीची फुले मुंबई व नाशिक येथून मागविण्यात आली होती.
या विशेष शृंगारामुळे मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. नयनरम्य दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मंदिरात उपस्थिती लावली होती.
वसंत पंचमीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता मंगल आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा जप व भागवत प्रवचन झाले. सकाळी नऊ वाजता विशेष शृंगार आरती, तर संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना भाविकांनी गर्दी केली होती.
ISKCON temple blooms with spring festival
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…