नाशिक : प्रतिनिधी
बहीण-भावाच्या अतूट नात्याची वीण अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण आज उत्साहात साजरा होणार आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची कामना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. त्यामुळे रक्षाबंधनाला भावनिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे.
यंदा पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.08 वाजता सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.47 वाजता समाप्त होत आहे. पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी दिवसभर रक्षाबंधन साजरे करता येणार असल्याने बहिणींमध्ये राखी खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बाजारात यंदा ‘इव्हिल आय’, अमेरिकन डायमंड, चंदन तसेच लहान मुलांसाठी छोटा भीम आणि रेनबो डिझाइनच्या राख्यांना मोठी मागणी आहे. साध्या आणि आकर्षक राख्या 10 रुपयांपासून 240 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांमध्ये 10 ते 30 रुपयांच्या राख्यांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कार्टून राख्यांचे आकर्षण
लहान मुलांसाठी बाजारात विविध रंगांच्या आणि कार्टूनच्या आकर्षक राख्या दाखल झाल्या आहेत. सिल्व्हर आणि गोल्डन कोट असलेल्या राख्या तुलनेने महाग असल्या तरी त्यांच्या आकर्षक डिझाइनमुळे त्यांना पसंती मिळत आहे. विशेषतः स्पायडरमॅन, मिकी माऊस, डोनाल्ड डक आणि छोटा भीम यांच्या राख्यांना लहान मुलांकडून मागणी आहे. याशिवाय गोंडा राखी, राजस्थानी राखी, रेशीम राखी, स्टोन राखी आणि डिस्को लाइट राख्याही बाजारात उपलब्ध आहेत. भावाच्या आवडीचा विचार करून राखी निवडण्यासाठी बहिणी बाजारात गर्दी करत असून, विविध डिझाइन आणि किमतींमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे रक्षाबंधनामुळे शहरातील राखी बाजाराला चांगलीच रंगत आली आहे.
It is Raksha Bandhan today; crowds of women are in the market to buy Rakhis.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…