अडवून दाखवाच! सरकारला आव्हान; परवानगीचा पेच कायम
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडकण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार कायम आहे. मुंबईत 100 टक्के येणार, अडवून दाखवाच, असे थेट आव्हान जरांगेंनी सरकारला दिले आहे. आता अडविले तर मग लाखो मराठ्यांना मुंबईत बोलावतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे, जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत प्रस्तावित आंदोलनाच्या परवानगीचा सरकारी पेच अजून कायम आहे. आंदोलनास अद्याप पोलिसांची परवानगी मिळालेली नसतानाच आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत हालचालींना जरांगे यांनी वेग दिला असून, नवीन कार्यक्रम व वेळापत्रक जाहीर केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत भाषेचे कारण देणार्या मंत्र्यांवरही जरांगेंनी जोरदार टीका केली. आजपर्यंत हीच भाषा गोड लागत होती, आता शेण खाल्यानंतर ती रूचायला लागली का, असा थेट सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस बोलणार असल्यास चर्चेला जाण्याची तयारीही जरांगेंनी दर्शविली आहे. मागण्या मान्य केल्याचे सरकार सांगत असले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कालबध्द काळात त्याची अंमलबजावणी कशी कराल ते जाहीर करण्याची मागणीही जरांगेंनी केली.
या सर्व घडामोडीत, आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांनी 50 आंदोलकांची नावे, संपर्क क्रमांक तसेच ते मुंबईत कोणत्या वाहनातून येणार आहेत, याची माहिती जरांगे पाटील यांच्याकडून मागवली आहे. ही माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्यात सादर केल्यानंतर परवानगीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, किती कार्यकर्ते सोबत येणार याची माहिती यापूर्वी वारंवार पोलिसांना दिल्याचे जरांगेंनी माध्यमांना सांगितले. मुंबई पोलिसांनी या आंदोलनासाठी यापूर्वी तीन वेळा परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळावी यासाठी मराठा आंदोलनातील नेते उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ सरकारी वकील शिशिर हिरे यांची भेट घेतली. आंदोलनाला परवानगी का नाकारण्यात आली आणि गणेशोत्सवाच्या काळात आंदोलनाला परवानगी देणे का योग्य ठरणार नाही, याबाबतची पोलिसांची भूमिका सरकारी वकिलांना सांगण्यात आली. प्रकरण न्यायालयात गेल्यास पोलिसांकडून आपली बाजू मांडली जाणार असून त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
जरांगेंनी उपचार घ्यावेत : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंना तातडीने उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्वतःहून तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. डॉक्टरांनीही जरांगेंना उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
मराठा आरक्षण कामकाजासाठी
शिंदे समितीला मंत्रालयात कार्यालय
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा-कुणबी नोंदींचा शोध आणि आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला मंत्रालयातील नवीन प्रशासकीय भवनात स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. समितीसोबतच मराठा आरक्षण कक्षालाही याच जागेतून कामकाज करता येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. शिंदे समितीला जागा उपलब्ध झाल्यामुळे मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी नोंदींच्या शोधासंदर्भातील कामकाजासाठी अधिक सुलभता होण्याची अपेक्षा आहे. समितीच्या कामकाजासाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय असल्याचे सरकारच्या आदेशातून स्पष्ट होते.
पाटोद्याहून आज मुंबईकडे निघणार
आज, गुरुवारी (दि. 17) दुपारी एक वाजेनंतर पाटोद्याहून मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. सरकारचा नवा मसुदा पाहून तारीख सांगितल्यावर मराठ्यांनी मुंबईत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पाटोद्यापर्यंत आलेल्या कार्यकर्त्यांना माघारी जाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 18 सप्टेंबरला सकाळी दहापर्यंत मुंबईच्या जवळ पोहोचतील.
Jarange is definitely marching to Mumbai.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…