महाराष्ट्र

जरांगेंची तब्येत बिघडली; तपासणीला दिला नकार

जालना :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मंगळवारी (दि. 1) चौथा दिवस होता. दुपारी दीडच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. जरांगे पाटील यांना उलटी आणि मळमळ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्याने आरोग्य पथकातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला.आंदोलनस्थळी तैनात असलेल्या आरोग्य पथकातील डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती तपासण्यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबाबत आवश्यक वैद्यकीय निरीक्षण नोंदवता आले नाही.उपोषणामुळे शरीरावर होणारे परिणाम लक्षात घेता डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी तपासणीस नकार दिल्याने आरोग्य पथकासमोरही अडचण निर्माण झाली आहे.

Jarange’s health deteriorated; refused examination.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago