जात पंचायतींना बंदी, आंतरजातीय विवाहास संरक्षण

जात पंचायतींना बंदी, आंतरजातीय विवाहास संरक्षण

गृह विभागाचे परिपत्रक

नाशिक: प्रतिनिधी

शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा केला. मात्र त्याचे नियम अजुन बनविले नाही. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीत अडचणी येत होत्या. शिवाय पळवाटा शोधुन जात पंचायतचे कामकाज चालू होते. आता जात पंचायत बसणे,हा गुन्हा समजला जाणार आहे. त्या बाबतचे परिपत्रक आज महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आले.

शक्ती वाहिनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना तसे आदेश दिले आहे. महाराष्ट्र शासनाने या निर्देशानुसार आज परिपत्रक प्रसिध्द केले आहे. या परिपत्रकानुसार जात पंचायत बसल्याची पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी त्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.पोलीसांनी दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा उल्लेख सुद्धा या परिपत्रकात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात जात पंचायतींना मूठमाती मिळणार आहे.
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाच्या वेळेस पोलीस बर्‍याच वेळेस संदिग्ध भुमिका घेतात पण या परिपत्रकमुळे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. अशा जोडप्यांना धमकी देणे, ऑनर किलींग सारख्या घटनांना त्यामुळे अटकाव होणार आहे.

“सरकारच्या या निर्णयामुळे आता विविध जात पंचायतींना बैठक, मेळावे घेण्यास कायदेशीर मनाई करण्यात आली आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यातील पळवाटा आता बंद होणार आहे.
आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांचे ऑनर किलींग या निमित्ताने थांबणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे आम्ही स्वागत करत ”


कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago