नाशिक

पंचवटीत टवाळखोरांच्या अड्डयांंवर जेसीबी

कारवाईने धाबे दणाणले; नागरिकांकडून पोलिसांच्या धडक कारवाईचे स्वागत

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. एक दिवसाआड शहरात खुनाच्या घटना, कोयते घेऊन तोडफोड करणारे टोळके, रील्स बनवून दहशत माजवणार्‍या टोळ्या पोलिसांसमोर रोज नवनवीन आव्हान उभे करत आहेत. पोलीस आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आणि मनपा अतिक्रमण विभाग यांच्या वतीने संयुक्तरीत्या पंचवटीतील पेठरोड सिग्नल ते फडोळ चौक या भागातील रस्त्यावरील, तसेच आरटीओ कार्यलयासमोरील भागात टवाळखोरांचे अड्डे असलेल्या टपर्‍या व हातगाड्यांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले. नागरिकांकडूनदेखील पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत केले जात आहे.

नाशिकमध्ये जेसीबी पॅटर्न

उत्तर प्रदेशात गुन्हेगारांविरुद्ध बहुचर्चित बुलडोझर पॅटर्न राबवण्यात येतो. त्याच धर्तीवर बुधवारी (दि. 8) पंचवटीत थेट जेसीबीने कारवाई करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील जवळपास 20 ते 25 टपर्‍या आणि शेड, तसेच नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, स्वर्गीय गंगाधर बाबूराव फडोळ चौक लिंकरोड ते शरदचंद्र पवार मार्केट यार्ड सिग्नलपर्यंत असलेल्या अनधिकृत टपर्‍या व शेड थेट जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. यादरम्यान काही व्यावसायिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी हिसका दाखवताच ते शांत बसले.

 

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago