समस्यांच्या ट्रॅकवर जॉगिंग!

 

 

समस्यांच्या ट्रॅकवर जॉगिंग!

नाशिक ः देवयानी सोनार

हिवाळा सुरू झाल्यानंतर व्यायामप्रेमी नागरिकांची जॉगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली आहे. महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी ट्रॅक बनविले असले तरी हे जॉगिंग ट्रॅक समस्यांग्रस्त झाले आहेत. ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा आणि उडणारी धूळ यामुळे आरोग्यासाठी धावणार्‍या नागरिकांना अनारोग्याचा सामना करावा लागत आहे.

गुलाबी थंडीचा आनंद घेत रोजच्या धावपळीत शरीरही तंदुरुस्त ठेवण्यासाठी नाशिककर ट्रॅकवर येत आहेत. शहर आणि उपनगरांतील विविध ठिकाणच्या जॉगिंग ट्रॅकवर नागरिक व्यायाम, चालणे, पळणे आदी प्रकारांना पसंती देत आहेत. मात्र,  जॉगिंग ट्रॅकवर वाढती गर्दी आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे हिरमोड होत असल्याचे चित्र आहे. चालताना खड्ड्यांमुळे उंच, सखल भागामुळे चालण्याचा वेग आणि वारंवार गती आणि मार्ग बदलत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

शहर आणि उपनगरांत एकूण 37 जॉगिंग ट्रॅक आहेत. जॉगिंग ट्रॅकवर अनेक ठिकाणी खड्डेे, धुळीचे साम्राज्य, पालापाचोळा, प्लास्टिक कचरा आदी आढळून येतात. त्यामुळे नागरिकांना सकाळ आणि सायंकाळच्या वेळी जॉगिंग ट्रॅकवरून चालण्यास अडचणी येतात.सहाही विभागातील जॉगिंग ट्रॅकवर पावसामुळे खड्डेे पडले असल्याचे नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे.

दररोज मारले जाते पाणी

जॉगिंग ट्रॅकवर सकाळी पाणी मारणे, कचरा साङ्ग  करणे आदी देखभालीची कामे नियमित होत असल्याचे उद्यान विभागाचे उद्यान निरीक्षक विजयकुमार मुंढे यांनी सांगितले.

 

तंदुरुस्तीसाठी धडपड

सकाळच्या प्रसन्न वातावरणात व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामप्रेमी जॉगिंग ट्रॅक किंवा उद्यानांमध्ये हजेरी लावतात. धावणे, चालणे, प्राणायाम, शारीरिक व्यायामप्रकार करून सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना काळात निर्बंध असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. जॉगिंग ट्रॅकही ओस पडले असल्याने धुळीचे साम्राज्य, कचरा, झाडांचा पालापाचोळा, प्लास्टिक कचरा, वाढलेले गवत, दुर्गंधीयुक्त वातावरण यामुळे जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली होती.

टवाळखोरांचा उपद्रव!

जॉगिंग ट्रॅकवर प्रेमीयुगुलांचा तसेच घोळका करून  टवाळखोरांचा वावरही वाढला आहे. जॉगिंग ट्रॅकच्या मार्गात अथळला निर्माण होईल असे उभे राहणे, मुलींना छेडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह व्यायामप्रेमींनाही अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago