नाशिक

नाशिकच्या जागेवरून महायुतीतच जुंपली

जागा आम्हालाच-शिवसेना, सर्वाधिक मतदार आमचेे- भाजप

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील भाजप-शिवसेनेत ताणाताणी सुरू असतानाच शुक्रवारी (दि.29) शिवसेना शिंदेसेनेने नाशिकची जागा सेनेला सुटल्याचा दावा करून टाकला असून, यावर आज शनिवारी (दि.30) अधिकृत घोषणा होणार असल्याचा दावा सेनेच्या एका नेत्याने केला आहे.
विधान परिषदेसाठी सर्वाधिक मतदार आमच्याकडे असून, नाशिकची जागा आम्हीच लढणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे. यामुळे मात्र महायुतीत कमालीची संभ्रमावस्था वाढली असून, दोन्ही पक्ष नाशिक सोडण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी माजी स्थायी सभापती गणेश गिते यांच्यासह नीलेश बोरा यांनी अपक्ष अर्ज घेतले आहे. गिते आजच शनिवारी (दि.30) त्यांचा अर्ज भरणार आहेत.
शनिवारी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच गाजू लागला आहे. या जागेसाठी भाजपकडून आग्रह धरण्याबरोबरच उमेदवारांचीही चर्चा सुरू असतानाचा नाशिकची जागा शिवसेनेला मिळाल्याचा दावा त्यांचे पदाधिकारी करत आहेत. तसेच यावर अधिकृत शिक्कामोर्तब शनिवारी होणार असल्याचा विश्वास त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
सेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडेंनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि कार्यक्रम लागू झाल्यापासून महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विशेषकरून ही जागा भाजपला मिळावी, यासाठी भाजप श्रेष्ठींकडून पूर्णपणे ताकद लावली जात आहे. कुंभमेळा तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जोर लावला जात आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेविषयी ठोक असे दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांना सांगता येत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांनी मुंबईत ठाण मांडून या जागेसाठी आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष आग्रह धरला. नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने विद्यमान जागेवर आपलाच हक्क असावा अशी भूमिका पक्षाकडून व्यक्त करत नाशिकची जागा शिवसेनेच्याच पदरात पडल्याचा दावा होतो आहे. सेनेकडून नरेंद्र दराडे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी आणि उपनेते तथा जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, आ. सुहास कांदे यांच्या पत्नी अंजूम कांदे यांची नावे चर्चेत आहे. मात्र पक्षाकडून दराडे यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते आहे. परंतु असे असले तरी भाजपने सेनेची वाट अद्याप तरी मोकळी केली नाही. त्यामुळे शनिवारचा दिवस अत्यंत महत्वाचा समजला जाणार आहे.
पक्षाकडून सूचना, आज अर्ज भरणार
पक्षाने यापूर्वीच आपल्याला विधानपरिषद निवडणुकीसाठी तयारीला लागण्यास सांगितले होते, त्यानुसार आपण अर्ज घेतला असून, आज शनिवारी (दि.30) भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहे.
-गणेश गिते, माजी स्थायी अध्यक्ष, मनपा

भाजपच्या गिते, बोरांनी नेले अर्ज

नाशिकच्या जागेसाठी भाजपकडून विशेष आग्रह धरला जात असून, भाजपमधून मनपाचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा तसेच युवा नेते भूषण कासलीवाल या तीन नावांची जोरदार चर्चा आहे. यापैकी गिते आणि बोरा यांनी पक्षासह अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज नेले असून, आपली उमेदवारी पक्की असल्याचा दावा केला आहे.

Joined the Mahayuti from the Nashik seat

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago