महाराष्ट्र

पुण्यात विषारी दारूचे पंधरा बळी

मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पुणे : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी (बनावट) दारू प्यायल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींना अजिबात सोडू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.

ही घटना प्रामुख्याने पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी, दापोडी आणि पुण्यातील हडपसर या भागात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत या भागात दूषित देशी दारू प्यायल्यानंतर अनेक नागरिकांना पोटदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान काहींचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, या दारूमध्ये ’मिथेनॉल’ हे विषारी रसायन मिसळले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही काही बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली असून या घटनेला त्यांनी ’एका प्रकारची हत्याच’ म्हटले आहे. या गुन्ह्यात सामील असलेल्या एकाही दोषीला आणि तस्कराला सोडले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Fifteen victims of poisonous liquor in Pune

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…

3 minutes ago

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

21 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

21 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

21 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

21 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago