नाशिक

ऐतिहासिक अन् धार्मिक महत्त्व लाभलेले गोदावरीमाता मंदिर

मनमाडकरांचे श्रद्धास्थान : तेलगू भाषिकांकडून मंदिराची स्थापना

मनमाड : प्रतिनिधी
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात रोजगाराच्या निमित्ताने होणारे नागरिकांचे स्थलांतर ही एक सामायिक बाब आहे. हे नागरिक आपल्यासोबत आपल्या प्रांतातील संस्कृती, परंपरा आणि श्रद्धादेखील घेऊन येतात. असाच एक सुंदर सांस्कृतिक संगम महाराष्ट्रातील मनमाड शहरात पाहायला मिळतो, जिथे तेलगू भाषिक नागरिकांनी स्थापन केलेले गोदावरीमाता मंदिर आज अवघ्या मनमाडकरांचे आणि नाशिक जिल्ह्याचे श्रद्धास्थान बनले आहे.
मध्य रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे शहर म्हणून मनमाडची ओळख आहे. येथे असलेला इंधन प्रकल्प, आशिया खंडातील एकमेव फूड ग्रेन गोडावून आणि रेल्वे इंजिनिअरिंग कारखान्यामुळे देशभरातून आलेले कामगार येथे स्थायिक झाले आहेत. यांपैकी एक महत्त्वाची वस्ती म्हणजे तेलगू भाषिकांची वस्ती होय. सण-उत्सवांच्या काळात मूळ प्रांतात जाणे शक्य होत नसे, त्यावर मात करण्यासाठी येथील तेलगू नागरिकांनी मनमाडमध्येच गोदावरीमाता मंदिराची
स्थापना केली.
सामान्यतः मंदिरे पौराणिक कथेवर असतात; परंतु या मंदिराचे नाव पडण्यामागची कथा रंजक आहे. पूर्वी मनमाडवरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी अजिंठा एक्स्प्रेस मीटरगेज मार्गावरून कोळशाच्या इंजिनावर धावत असे. त्या काळी या मार्गाला गोदावरी लोहमार्ग म्हटले जात असे. योगायोगाने याच रेल्वेमार्गालगत देवीच्या मंदिराची स्थापना झाल्यामुळे रेल्वेमार्गाच्या नावावरून मंदिराचे नाव पडले. सुरुवातीला तेलगू भाषिकांपुरते असलेले हे मंदिर आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
शेकडो वर्षांपासून मनमाडच्या मातीत रुजलेले हे मंदिर आता एका प्रांतापुरते मर्यादित राहिलेले नाही. मनमाडमधील प्रत्येक नागरिक येथे मनोभावे पूजा-अर्चा करतो. यात्राकाळात होणारा उत्सवाचा माहोल शहराच्या सामाजिक व धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवतो.

धार्मिक उत्सव अन् श्रद्धा

या मंदिरात रोज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. नवरात्रीत मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढ महिन्यात येथे मोठा यात्रोत्सव भरतो, ज्यामध्ये दक्षिण भारतीय भाविकांसह हजारो नागरिक उपस्थित राहतात. सध्या हे ऐतिहासिक मंदिर आझाद हिंद केसरी ट्रस्टच्या ताब्यात असून, ट्रस्टतर्फे मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते.

The Godavari Mata Temple, which holds historical and religious significance

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

8 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

8 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

8 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

8 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

8 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago