आस्वाद

कल क्या होगा किसने जाना?

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिकमध्ये सध्या कामांची लगीनघाई सुरू आहे. शहरातील जवळपास सर्वच रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे खोदकाम नागरिकांच्या जिवावर उठले आहे. शुक्रवारी आणखी एक वकील महिलेचा रस्ते अपघातात बळी गेला. उड्डाणपुलावरून जाणार्‍या कंटेनरने या तरुण महिलेचा बळी घेतला.
कुंभमेळ्यामुळे रस्त्यांचे सुरू झालेले काम, एमएनजीएल रस्त्यांचे खोदकाम आणि नाशिककरांचा ट्रॅफिक मोडण्याचा आता झालेला सुळसुळाट याने एकंदरीतच या वर्षात अनेक अपघात घडत आहेत आणि नुसते घडत नाहीत, तर त्यात अनेक जणांचा मृत्यू होत आहे. कारणे खूप आहेत. सर्व नियमावली आपल्या हितासाठी असूनदेखील ती आपल्याला जाच वाटते, हेपण खरे आहे. हिरोगिरीच्या नादात तर कधी घाईत का असेना आपण ट्रॅफिकचे नियम मोडत आहोत. बाइकवाले त्याची लेन सोडून, मधल्या लेनवर येतात अणि अजून पुढे काही आले तर अजून पुढील लेन म्हणजे डिव्हायडरच्या लेनकडे जातात. वास्तविक त्याची डावी लेन असते तिकडूनच त्यांनी चालले पाहिजे अणि ओव्हरटेक करताना आधी आरशात बघितले पाहिजे. मागे कोणते गाडी नाही ना, मग ओव्हरटेक केले पाहिजे. आपण मेन रोड/हायवेला लागणार असू, तर आपले काम असते कोणते गाडी तर नाही ना येत? कारण मेन रोड, हायवेवरचे वाहने जोरात राहणारच. आपण मेनरोडला जात आहोत तर बघून घेतले पाहिजे, पण बाइकवाले अणि इतरही लोक डायरेक्ट मध्ये गाडी घुसवतात. नियम मोडणार्‍यांमध्ये जागृती करण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. पण शंंभर घेऊन आपल्याला मूर्ख ठेवतात अणि आपणपण चारशे वाचले म्हणून खूश होतो.
रिक्षावाल्यांचा विषय तर फार गंभीर आहे. गावाकडून तडीपार अणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 70 टक्के लोक आहेत आणि बाइक चालवणार्‍यांनाही वाहतूक नियम माहीत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणले होते की, अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा धडा टाकणार आहोत. पण आज सात वर्षे झाली, पण काहीच अंमलबजावणी झालेेली नाही. आपण हुशार झाले पाहिजे. आपली रस्त्यावरील लेन कोणती, नियम काय ते माहीत करून घ्या. आपल्या घरातील महिला अणि मुलांना सांगा, आपणपण माहिती घ्या. सुरक्षित राहा. सुखरूप जगा अणि जगू द्या, असे म्हटले गेले आहे.
जिंदगी एक सफर है, सुहाना यहा कल क्या होगा किसने जाना?

Kal kya hoga kisne jaana?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गुलामी

इतिहासात आपण भारतीय, कितीक लोकांचे आणि किती वर्ष गुलाम होतो हे आता आपल्याला चांगलेच ठाऊक…

1 hour ago

स्टारलिंकचे संकट आणि भारताची सुरक्षा भूमिका

- प्रा. राजेंद्र आढाव युक्रेनमध्ये रशियाविरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा…

1 hour ago

आभासी समृद्धीचा उथळ फुगा!

- सीमाताई मराठे ज्या वयात तरुणांच्या हातात बचत, गुंतवणूक आणि भविष्याची सुरक्षितता असायला हवी, त्या…

1 hour ago

प्रचार- प्रसार प्रभाव

- राजेश शिरभाते एकावेळेस कोणी आपल्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करतो, तर एखादा तरुण त्याचे…

2 hours ago

अन्नासाठी दाही दिशा… विकासाच्या दाव्यांमागचे कुपोषणाचे वास्तव

देशाची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, अन्नधान्याचे उत्पादन, महामार्गांची उभारणी आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा अभिमानाने उल्लेख…

2 hours ago

चिनी कुरापती

तिबेटच्या सीमेला लागून असलेला अरुणाचल प्रदेश आमचाच आहे, असा दावा चीन करत आला आहे. चीनने…

2 hours ago