नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर वारकरी संप्रदायाचे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून सुवर्ण कलशारोहण सोहळा आजपासून पासून सुरू होत आहे. दि २२ वैशाख कृष्ण सप्तमीला मुहूर्तावर वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कलशारोहण सोहळा हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने होणार आहे. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे प्रशासक ॲड.भाऊसाहेब गंभीरे यांनी याबाबतची माहिती दिली.
प्रशासकीय समितीचे प्रमुख सहाय्यक धर्मादाय आयुक्त राम लिप्ते, नगरपालिकेचे मुख्याधिकारी .संजय जाधव, पोलीस निरीक्षक श् संदीप रणदिवे हे कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर भाविकांकडून कलशारोहण करण्याची भावना व्यक्त होत होती. त्यानुसार सांप्रदायिक व धार्मिक पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. वैकुंठवासी ह.भ.प. गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट तर्फे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दररोज कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम होणार आहे.
रविवारी आणि सोमवारी दि १५ आणि १६ सुवर्णपट प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्रीमद् नरसिंह सरस्वती महाराज मूळपीठ देवस्थान आळंदी यांच्यातर्फे हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने सुवर्ण पसायदान व सुवर्ण कलशाची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.
दिनांक २० ते २२ मे यादरम्यान भव्य रुद्र स्वाहाकार यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे पुजारी जयंत गोसावी यज्ञाची मुख्य यजमान असतील. श्री निवृत्तीनाथ भजनी मंडळ यांच्यातर्फे यज्ञाचे संयोजन केले जाईल. या यज्ञासाठी वारकरी संप्रदायातील राज्यभरातील संस्थानांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ कीर्तनकार, माजी विश्वस्त तसेच प्रशासकीय अधिकारी हे यजमान म्हणून उपस्थित राहणार आहे.
दिनांक २२ मे रोजी संतवीर बंडातात्या कराडकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. प्रसाद महाराज अमळनेरकर, मारुती बाबा कुऱ्हेकर, ह.भ.प.माधव महाराज घुले महंत सागरानंद सरस्वती, ह.भ.प.शिवराम बाबा म्हसकर, ह.भ.प. रघुनाथ बाबा खटाने यांच्या हस्ते कलशपूजन होणार आहे.
यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर व नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर -पंढरपुर, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटी- आळंदी,सोपान महाराज संस्थान- सासवड, तुकाराम महाराज संस्थान- देहू, संत मुक्ताबाई संस्थान-मुक्ताईनगर, एकनाथ महाराज संस्थान- पैठण,नामदेव महाराज संस्थान-पंढरपूर, गजानन महाराज संस्थान- शेगाव, व संत निळोबाराय संस्थान- अहमदनगर या ठिकाणचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
वारकरी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या निवृत्तीनाथ कळसा खाली महाराष्ट्रातील २२० किल्ल्यांची माती टाकण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवित्र नद्यांचे जल अभिषेकासाठी आणण्यात येणार आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न करून केंद्र शासनाने निवृत्तीनाथ मंदिर परिसरासाठी मंजूर केलेल्या प्रसाद योजनेच्या कामाचे भूमिपूजन हि याच सोहळ्यात होणार आहे. वारकरी भाविकांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घरबसल्या घडण्यासाठी ऑनलाईन दर्शनाचा शुभारंभही याच सोहळ्यादरम्यान करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रशासकीय मंडळाने दिली आहे
हे ही वाचा :
Attachments area
|
|