टेनिस बॉल गिळल्याने चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी 

टेनिस बॉल गिळला गेल्याने जेलरोड येथील साने गुरुजी नगर येथे राहणाऱ्या एका १७ महिन्याच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शिवांग संकेत बोराडे असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी (ता.१२) शिवांग हा आपल्या घरामध्ये खेळत असताना त्याने अचानक टेनिस बॉल गिळला .  त्याच्या वडिलांनी तत्काळ बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *