नाशिक: प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदार संघात उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तेथे मन न रमल्याने पुन्हा ठाकरे गटात आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. जनतेची कामे करण्यासाठी आता त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाला हा आणखी एक धक्का मानला जात आहे. मागच्याच आठवड्यात उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली होती, ते देखील भाजपच्या वाटेवर असतानाच बबन घोलप यांचीही वाटचाल भाजपकडे आहे. दुसरीकडे शरद पवार गटात असलेले अशोक सातभाई यांनीही शरद पवार गट सोडण्याचा निर्णय घेतला असून ते देखील भाजपात प्रवेश करणार आहे, बबन घोलप हे माजी मंत्री असून त्यांचा मुंबईत लवकरच प्रवेश सोहळा होणार असल्याने भारतीय जनता पार्टी नाशिक महापालिकेच्यादृष्टीने जोरदारपणे कामाला लागली असून संघटन वाढीसाठी इतर पक्षातील नाराजाना खेचत आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…