महापालिका आयुक्तांचे आश्वासन
सिडको : विशेष प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू करण्याचा आदेश देतेवेळीच कर्मयोगीनगर येथील रस्त्याचा सव्वाकोटी रुपयांचा निधी गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुन्हा हा निधी देऊन रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन मनपाच्या प्रभारी आयुक्त करिश्मा नायर यांनी दिले.
प्रभाग क्रमांक 24 मधील ‘भामरे मिसळ ते रणभूमी’ या अठरा मीटर रस्तादुरुस्तीसाठी सन 2022 पासून शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने वेळोवेळी आंदोलने करून पाठपुरावा केला. यानंतर सन 2023-24 व सन 2024-25 च्या अंदाजपत्रकात रस्ते बांधणे-संगणक कोड नं. 2585 नुसार यासाठी सव्वाकोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पाठपुराव्यानंतर कामाला मंजुरी देण्यात आली.
बांधकाम विभागाने 14 डिसेंबर 2024 रोजी या कामाचे टेंडर वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारही निश्चित केला. काम सुरू करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला. तेव्हा निधी गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.
सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने कामाची वर्कऑर्डर अर्थात, कार्यारंभ आदेश काढता येत नाही, असे सांगितले गेले.
याप्रकरणी चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगीता देशमुख, संगीता डामरे, शिल्पा देशमुख, प्रतिभा पाटील, वंदना पाटील, नीलेश ठाकूर, बापूराव पाटील, प्रकाश वरखेडे, आदित्य येवला, सतीश मणियार, सुपडू बढे, बाळकृष्ण पेंढारकर, शंकर जाधव, श्यामकांत शुक्ल, लक्ष्मीकांत गर्गे, प्रवीण कुलकर्णी, संतोष कोठावळे, अविनाश कोठावदे यांच्यासह नागरिकांनी प्रभारी आयुक्त करिश्मा नायर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन अंदाजपत्रकातून तरतूद गायब कशी झाली, याची चौकशी करावी. पुन्हा निधी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…