गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचले जनावरांचे प्राण
लासलगाव : प्रतिनिधी
कत्तलीसाठी चार गोवंशाला घेऊन जाणाऱ्या पीकअप गाडीला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे लासलगाव पोलीसांनी वेळीच पकडल्याने या जनावरांचे प्राण वाचले.या प्रकरणी जनावरे घेऊन जाणाऱ्या दोघांविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार टाकळी विंचूर परिसरातील एस डी ए स्कूल समोरील रस्त्यावरून सोमवार दि १० रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या दरम्यान कत्तलीसाठी चार गोवंशाला आरोपी योगेश संजय थेटे वय 24,रमजान ऊर्फ फजल शरफोदीन शेख वय 29 दोन्ही रा .पालखेड मिरची ता निफाड हे दोघे जण पीक अप क्र एम MH 15 HH 8304 या गाडीतून घेऊन जात असल्याची माहिती लासलगाव व टाकळी परिसरातील गोरक्षकांना मिळाली.
या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद जिल्हा सदस्य संतोष केंदळे यांनी बजरंग दल जिल्हा संयोजक समाधान कापसे यांना वरील प्रकार सांगितला असता
कापसे यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात माहिती कळवली असता पोलीस उप निरीक्षक अजिनाथ कोठाळे है पोलिस कर्मचाऱ्यांसह तसेच गोरक्षक सूरज नाईक,संजय होळकर,चिराग जोशी,अविनाश काळे.संदिप हारळे.कुणाला कवार आदी बजरंग दल चे कार्यकर्ते घटनास्थळी हजर झाले व या पीकअप गाडीला अडवून गाडीतल्या जनावरांबाबत विचारपूस केली असता या दोन्ही गुन्हेगारांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.या वेळी पिकप गाडीतील गोवंश अतिशय वाईट परिस्थितीत गाडीत बांधून कत्तलीसाठी जात असल्याचे आढळून आले.या घटनेतील गुन्हेगारांसह पीकअप गाडी व जनावरे पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि अजिनाथ कोठाळे पोलिस कर्मचारी कैलास महाजन,प्रदीप अजगे,सागर आरोटे करत आहे
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…