धगधगत्या मशालीने घडविला होता इतिहास
शिवसेनेचे जुनेच चिन्ह; भुजबळांनी मिळवला होता विजय
नाशिक: भागवत उदावंत
उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या
शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिलेले मशाल हे चिन्ह काही नवीन नाही, मशाल या चिन्हाशी शिवसेनेचे जुने नाते आहे, याच मशालीने मुंबईत इतिहास घडला आहे,
शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आले पण यापूर्वी देखील शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह होते.
*छगन भुजबळ हे नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते…*
*2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि ते शिवसेनेचे एकमेव आमदार झाले. त्यानंतर एप्रिल मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यात देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते*
1985 साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी चिन्ह होते “धगधगती मशाल” या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली आणि मशालीने इतिहास घडविला होता.
सोशल मीडियावर पेटल्या मशाली
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मशालीने स्टेटस अपडेट केले, तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गाणे तसेच पोस्टर लॉन्च केल्यानंतर सोशल मीडियावर ही अनेकांनी हे नवीन चिन्ह तसेच गाण्याचे स्टेटस ठेवले, तर काहींनी सामना या चित्रपटातील उषा काल होता होता काळ रात्र झाली,,,हे गाणे स्टेटस लावले, तर काही ठिकाणी मशाली पेटवत जल्लोष केला,
,,,,,,,
शिंदे गटाकडूनही पोस्टर लॉन्च
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने अद्याप चिन्ह दिले नसले तरी बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे, शिंदे गटानेही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावत आम्ही बाळासाहेबांचे वारसदार अशी टॅग लाईन देण्यात आली होती,
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…