नाशिक

रिपब्लिकन सेनेचे बळ वाढले; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार : अविनाश शिंदे

नाशिक : प्रतिनिधी
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिकमधील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. रिपब्लिकन सेनेचा विजय असो, आनंदराज आंबेडकर आगे बढो- हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.
शहरातील ठक्कर बझारजवळील रिपब्लिकन सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा दिमाखदार सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा पार पडला.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे जिल्हा प्रभारी व राज्य नेते अ‍ॅड.विनय कटारे, जिल्हा कार्याध्यक्ष मारुती घोडेराव, जिल्हा सचिव आरिफ मन्सुरी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय साबळे, महासचिव जितेश शार्दूल, महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई थोरात, उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे, युवक जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, महिला महासचिव कोमल पगारे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता प्रा. अमोल बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष विवेक तांबे, महिला शहराध्यक्ष सोनुताई उजागरे, नाशिक महानगरप्रमुख डॉ. अनिल आठवले, महानगर सचिव संदीप काकळीज आदी होते.
प्रवेश करणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये संतोष भालेराव, कैलास दवंडे, आसिफ शेख, रवींद्र सरकटे, जितेंद्र पेटारे, गुलशन खैरनार, सागर परदेशी,
प्रफुल्ल बागूल, राहुल बर्वे, प्रवीण उन्हवणे, विनोद पगारे, कुणाल पगारे, धीरज चव्हाण, महेंद्र माळी, उमेश कांबळे, उमेश कांबळे, लाला वेळकर, जमीर मकानदार, गणेश जगरी यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा एकप्रकारे शुभसंकेतच म्हणावा लागेल. रिपब्लिकन सेना नाशिक महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे.
शिवसेना शिंदे गटाने रिपब्लिकन सेनेला त्यांच्या कोट्यातील 10 टक्के जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे यावेळी नाशिक महापालिकेत रिपब्लिकन सेनेचे खाते निश्चितच उघडले जाईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
रिपब्लिकन सेनेत प्रवेश केलेल्या सर्वांचा सन्मान बाळगला जाईल व त्यांना मानाची पदे दिली जातील, असेही शिंदे यांनी सांगितले. आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सोनूताई उजागरे

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश शिंदे यांनी पक्षाच्या महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सोनूताई उजागरे यांची नियुक्ती केली. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात याबाबतची घोषणा करण्यात आली. रिपब्लिकन सेनेच्या महानगर उपाध्यक्षपदी मनीषा वंजारे, लता रोडे, रेखा गजने, महासचिवपदी मुस्कान बेग, अश्विनी जाधव, कोषाध्यक्षपदी कृष्णाबाई सगर, सहसचिवपदी रसिदा पठाण, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून राजकन्या गरड, सहसदस्यपदी पूनम बर्वे, सदस्यपदी सुपा उशिरे, रेखा शिंदे, रेखाबाई कांबळे, शोभा वावळे, पल्लवी लते, सुरेखा कांबळे, लंका उजगिरे, सोनाली विभुते, शोभा मोरे, नेहा गरड आदींची नियुक्ती करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रिपब्लिकन सेनेच्या महिला आघाडीने नाशिक जिल्हा, तसेच महानगरात महिलांचे व्यापक जाळे विणावे. पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आपले सर्व कसब पणास लावावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. शिंदे यांनी केले. नूतन जिल्हाध्यक्ष सोनूताई उजागरे यांनी पक्ष भक्कम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago