नाशिक

खरात न्यायालयीन कोठडीत; आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू

सिन्नर : प्रतिनिधी
मिरगाव येथील जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला सिन्नर न्यायालयाने मंगळवारी (दि. 2) न्यायालयीन कोठडी सुनावली. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्थिक व्यवहार, कथित फसवणुकीतील पैशांचा मागोवा आणि बनावट कागदपत्रांच्या अनुषंगाने पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली.
कुंदेवाडी येथील जगदंबा माता सहकारी पतसंस्थेतील 32 बनावट खात्यांच्या चौकशीप्रकरणी यापूर्वी खरातला अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात पाच दिवसांची पोलीस कोठडी भोगल्यानंतर त्याची रवानगी नाशिक रोड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात तपासासाठी सिन्नर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले. गेल्या आठवड्यात न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. या कालावधीत पोलिसांनी विविध आर्थिक व्यवहारांची छाननी केली. तसेच कथित फसवणुकीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणीही करण्यात आली. मंगळवारी न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने आपापली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, जमीन व्यवहारातील कथित फसवणुकीचा तपास सुरू असून आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांच्या सत्यतेबाबत अधिक माहिती गोळा केली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
छायाचित्रकाराला उपरोधिक टिप्पणी
सिन्नर न्यायालयात आणल्यानंतर अशोक खरात याचे छायाचित्र काढत असताना वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता जोशी यांच्याकडे पाहून त्याने उपरोधिक टिप्पणी केली. दत्ता, जमाना गेला तुझा फोटो काढता काढता, असे वक्तव्य त्याने केल्याने काही काळ न्यायालयीन परिसरात चर्चेला उधाण आले. उपस्थितांमध्ये या घटनेची चर्चा रंगली होती.

Kharat in judicial custody; scrutiny of financial transactions begins

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago