नाशिक

गोंदेश्वरच्या गाभार्‍यात शिवलिंगावर ‘किरणाभिषेक’

सिन्नर : प्रतिनिधी
पहाटेच्या वेळी सूर्य उगवला… पूर्व दिशेने आलेली सूर्यकिरणांची सोनेरी प्रभा नंदी मंडपातून थेट गोंदेश्वरच्या गाभार्‍यात पोहोचली… आणि काही क्षणांतच ती शिवलिंगावर स्थिरावली. सिन्नरच्या ऐतिहासिक श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी (दि. 29) निसर्ग आणि प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. शिवलिंगावर पडलेल्या सूर्यकिरणांनी जणू सूर्यनारायणानेच महादेवाला अभिषेक केल्याचा भाविकांना अनुभव आला.
दरवर्षी सप्टेंबर आणि मार्च महिन्याच्या अखेरीस गोंदेश्वर मंदिरात सूर्योदयाच्या वेळी हा नैसर्गिक किरणोत्सव पाहायला मिळतो. यंदा रविवारपासून सुरू झालेला हा किरणोत्सव शुक्रवारपर्यंत अनुभवता येणार आहे. मंदिराचे अभ्यासक व निरीक्षक दत्ता शेळके यांनी ही माहिती दिली.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून दत्ता शेळके या किरणोत्सवाचे सातत्याने निरीक्षण करीत आहेत. त्यांच्या निरीक्षणातून गोंदेश्वरचा हा वैशिष्ट्यपूर्ण किरणोत्सव भाविक आणि अभ्यासकांच्या लक्षात आला. वर्षभर शिवपूजा व अभिषेक करणारे सतीश सूर्यवंशी, रवी कोठुरकर, नितीन हटकर आणि भगवान यांचे सहकार्य लाभत असल्याचे शेळके यांनी सांगितले.

स्थापत्यकलेची अचूक ‘किमया’
सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडून येणारी किरणे नंदी मंडपातून विशिष्ट दिशेने प्रवास करीत गाभार्‍यात दाखल होतात. त्यानंतर ती थेट शिवलिंगावर पडतात. कोणत्याही कृत्रिम साधनाशिवाय घडणार्‍या या नैसर्गिक घटनेमुळे गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्यरचनेचे वैशिष्ट्य पुन्हा अधोरेखित होते.

मार्च, सप्टेंबरमध्ये सूर्यकिरणांचा ‘अभिषेक’
गोंदेश्वर मंदिरात वर्षातून दोनदा-मार्च आणि सप्टेंबरच्या अखेरीस-सूर्यकिरणे विशिष्ट पद्धतीने शिवलिंगावर पडतात. कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील सूर्यकिरणोत्सवाप्रमाणेच सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील हा सोहळाही निसर्ग, श्रद्धा आणि स्थापत्यवैभवाचा अनोखा संगम ठरत आहे.

 

‘Kiranabhishek’ (Sun-ray Anointment) on the Shivling in the sanctum sanctorum of Gondeshwar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago