नांदगाव-मनमाडमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी गुप्त बैठका
मनमाड : प्रतिनिधी
राज्यभरात विधान परिषदेच्या 26 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, यात नाशिक जिल्ह्याचाही समावेश आहे. या घोषणेमुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचे (नगरसेवक-नगरसेविका) भाव भलतेच वधारले आहेत. सध्या नांदगाव आणि मनमाड नगर परिषदेच्या वर्तुळात केवळ लक्ष्मीदर्शन आणि परराज्यातील सहली यांवरच खमंग चर्चा रंगताना दिसत आहे.
या निवडणुकीत कोणत्या पक्षाला जागा सुटणार आणि महायुती किंवा महाविकास आघाडीकडून नेमका कोण उमेदवार मैदानात उतरणार, हे अद्याप पूर्णपणे गुलदस्त्यात आहे. मात्र, राजकीय गणिते काहीही असो, आपल्याला काय मिळणार, यावरच सध्या नगरसेवकांचा मुख्य डोळा आहे. “उमेदवार कोणीही असो, आम्हाला कोण जास्त पैसे देईल आणि सहलीला कुठे घेऊन जाईल?” असा उघड आणि छुप्या स्वरूपातील संवाद सध्या नगरसेवकांमध्ये सुरू आहे. सत्ताधारी नगरसेवकांच्या विरोधकांसोबत गुप्त बैठका सुरू असून, या निवडणुकीतील सर्वांत मोठी आणि खळबळजनक बाब म्हणजे, नांदगाव-मनमाडमधील सत्ताधारी गटाच्या काही नगरसेवकांनी थेट विरोधी गटातील प्रमुख नेत्यांशी गुप्त बैठका घेतल्या आहेत. “उमेदवारी कोणालाही मिळो, ऐनवेळी आमच्याकडे योग्य ते लक्ष राहू द्या,” अशी थेट मागणी या नगरसेवकांनी विरोधकांकडे केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या गुप्त बैठकांमुळे स्थानिक राजकारणात अंतर्गत बंडाळी आणि फोडाफोडीची शक्यता बळावली आहे. बहुमत फुटू नये म्हणून निवडणुकीच्या काळात मतदारांना (नगरसेवकांना) अज्ञातस्थळी किंवा परराज्यात सहलीला नेण्याची राजकीय परंपरा आहे. यासाठी गोवा, महाबळेश्वर, हैदराबाद, गुजरात किंवा थेट राजस्थानमधील रिसॉर्ट्स बुक करण्याची प्राथमिक चाचपणी काही इच्छुकांच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे. त्यामुळे पॅकेज नेमके काय असेल, यावरच सध्या नगरसेवक खमंग चर्चा करत आहेत. एकंदरीत, अद्याप उमेदवारांची नावे निश्चित नसली, तरी नांदगाव-मनमाडच्या राजकीय गोटात लक्ष्मीदर्शन आणि सहलीच्या डोहाळ्यांनी निवडणुकीची रंगत आधीच वाढवली आहे.
घोडेबाजाराची जुनीच परंपरा..!
निवडणूक आयोगाने कितीही आचारसंहिता लावली, कितीही पारदर्शकता ठेवली तरी निवडणूक काळात पैशांचा आणि दारूचा महापूर वाहतो. यात अनेक प्रलोभने देऊन मतदारांना आकर्षित केले जाते. याला विधान परिषद निवडणूक कशी अपवाद राहील? या निवडणुकीलाही घोडेबाजाराची परंपरा आहे. या निवडणुकीत बहुमत नसतानाही व केवळ एक नगरसेवक असलेल्या पक्षाचे उमेदवारदेखील निवडून आल्याचा इतिहास आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीलाही घोडेबाजाराची परंपरा आहे.
Lakshmi Darshan and travel tips for corporators
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…