बोगस हजेरीला आळा; दिवसातून दोन वेळा उपस्थिती नोंद बंधनकारक
निफाड : विशेष प्रतिनिधी
रोजगार हमी योजनेतील बोगस हजेरी, बनावट मजुरी आणि निधीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता फेस ऑथेंटिकेशन प्रणाली सक्तीची केली आहे. या नव्या प्रणालीमुळे रोजगार सेवकांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन दिवसातून दोन वेळा मजुरांचे
फेस ऑथेंटिकेशन करावे लागणार असून, यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत काही ठिकाणी प्रत्यक्ष कामावर नसतानाही मजुरांच्या नावावर हजेरी लावली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक काटेकोर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन प्रणालीअंतर्गत रोजगार सेवकांना सकाळी काम सुरू होताना आणि सायंकाळी काम संपताना अशा दोन वेळा मजुरांची उपस्थिती फेस ऑथेंटिकेशनद्वारे नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामावर उपस्थित असलेल्या मजुरांनाच मजुरी मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेमुळे उपस्थितीची अचूक नोंद होऊन बनावट नोंदी आणि बोगस कामांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. फेस ऑथेंटिकेशन प्रणालीमुळे रोजगार हमी योजनेतील कामकाज अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शासनाच्या निधीचा योग्य वापर सुनिश्चित होऊन पात्र लाभार्थ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचण्यास मदत होणार आहे.
रोजगार हमी योजनेत शिस्त आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी प्रशासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला असून, आधुनिक पद्धतींमुळे कामाच्या ठिकाणी मजुरांची प्रत्यक्ष उपस्थिती निश्चित करणे शक्य होत आहे. अनियमितता, चुकीच्या नोंदी आणि मध्यस्थांमार्फत होणारे गैरप्रकार कमी होऊन योजना अधिक सक्षम आणि प्रभावी बनण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात
येत आहे.
फळबाग लागवड आणि घरकुल या दोन प्रकारच्या कामांना फेस ऑथेंटिकेशनमधून सवलत देण्यात आली आहे. मात्र, सिंचन विहिरी, गोठे, कुक्कुटपालन शेड, शेततळे यांसारख्या वैयक्तिक कामांवरही ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक कामांमधील गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. – नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, निफाड
Face authentication mandatory in the Employment Guarantee Scheme..!
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…