बचत गटांच्या महिलांना दिवाळी आधीच लक्ष्मी दर्शन
पाच हजार रुपये पासून ते वीस हजार रुपये पर्यंत पाकीट वाटप
मनमाड : आमिन शेख
निवडणुका म्हटले की पैसे आणि दारू यांचा महापूर त्यात जर निवडणुक ही धन दांडगे यांची असेल तर मग मजा काही औरच सध्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात देखील अशाच प्रकारची लढाई होताना दिसत आहे मात्र निवडणूक ही दिवाळीनंतर होणार असली तरी बचत गटांच्या महिला व पुरुषांना आत्ताच दिवाळी साजरी करण्याचा योग आला आहे तालुक्यातील वजनदार नेत्याकडून नांदगाव तालुक्यातील महिला बचत गटांना घरी बोलावून अध्यक्षाला वीस हजार रुपये व प्रत्येक महिलेला पाच हजार रुपये तसेच अर्धी साडी व काहींना पैठणी देण्याचा धडाका सुरू केला आहे या गोष्टीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून समोर विरुद्ध पार्टी द्वारे उमेदवारी करणाऱ्या तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाद्वारे या लक्ष्मी दर्शना बाबत टक्के टोमणे देण्यात आले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मताची किंमत सांगताना सांगितले आहे की जो कोणी आपले मत विकेल त्याने आपली मुलगी विकली असे समजावे इतक्या सुटसुटीत आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एक मताची किंमत ठरवून दिली आहे आपल्या एकमतामुळे आपल्यावर चुकीचे लोक राज्य करतील असेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे आपल्या मताचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवणाऱ्या तसेच संविधानिक पद्धतीने वागणाऱ्या लोकशाही जपणाऱ्या नागरिकाला मतदान करावे मग तो कोणीही असो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे मात्र नांदगाव तालुक्यात याउलट परिस्थिती उद्भवली असून आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज लढती मध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा पाऊस पडणार आहे याची सुरुवात झाली असून एका उमेदवारा तर्फे तालुक्यातील बचत गटातील महिला पुरुषांना आपल्या घरी बोलावून अध्यक्षाला वीस हजार रुपये तसेच प्रत्येक सदस्याला पाच हजार रुपये पैठणीचे नावाखाली साडी तसेच एक वेळचे जेवण देऊन विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे लक्ष्मीदर्शनाची नांदगाव तालुक्यात तुफान चर्चा सुरू असून विरोधी पक्षातील उमेदवाराकडील कार्यकर्ते तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे सोशल मीडियावर या लक्ष्मी दर्शनाची चिरफाड करण्यात येत आहे मुळात आज दहा 20 हजार रुपयाला विकल्या जाऊन चुकीच्या माणसाचे समर्थन करू नका असे या वाहन सोशल मीडिया मार्फत करण्यात येत आहे आज दिलेल्या दहा-वीस हजार रुपयांच्या बदल्यात तुमच्या पिढीला गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल दहावीस हजार रुपये तुम्ही तुमची लोकशाही विकत असल्याचे देखील सोशल मीडियावर चर्चा आहे
निवडणूक आयोगाची डोळेझाक…?
नांदगाव तालुक्यात खुलेआम आचारसंहिता भंग होताना उघड्या डोळ्यांनी जनता बघत आहे जनतेसोबतच िवडणूक निर्णय अधिकार्यासह इतर निवडणूक सहाय्यक अधिकारी प्रशासकीय कर्मचारी तसेच इतर निवडणूक कर्मचारी हे देखील बघत आहे मात्र याबाबत मुख्य निवडणूक आयोगासह कोणीही कारवाई करण्यासाठी धजावत नाही यामुळे नांदगाव तालुक्यात आचारसंहिता सुरू आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने विचारला जात आहे
अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साडी…
सिडको : दिलीपराज सोनार सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजवाडा येथे पती पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातुन…
144 हेक्टरवरील पिकांना फटका; नुकसानीचे पंचनामे होणार निफाड ः प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी…
विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण येवला ः प्रतिनिधी येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने…
नांदगाव ः प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्यांसोबत आमदार…
आडगाव परिसरातील कोणार्कनगर-2 येथील महादेव रो-हाउसमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.फिर्यादी…